Nashik Graduate Constituency : औरंगजेबाने (Aurangajeb) वडिलांना गाडीवरून उचलून बाजूला ठेवलं तशी गत इथं झाली आहे. एबी फॉर्म आपल्या हातात असताना सुद्धा मुलाने वडिलांचा मान राखला नाही. वडिलांना बाजूला करून त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला, तरी अजून कोणाचा पाठिंबा मिळवता आला नाही. असा घणाघात नाशिक (Nashik) पदवीधरचे अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांनी केला आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीची (Nashik Graduate Constituency) मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना आता नाशिक पदवीधरमध्ये दुरंगीच्या ऐवजी तिरंगी सामना बघायला मिळतो आहे. एकीकडे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) विरुद्ध शुभांगी पाटील (shubhangi Patil) असा सामना यापूर्वी होता. मात्र आता स्वराज्य संघटनेचे सुरेश पवार हे देखील मैदानात उतरल्यांना एकीकडे हा सामना तिरंगी होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये सुरेश पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खरंतर स्वराज्य संघटनेची स्थापना झाल्यानंतरची पहिली ही निवडणूक आहे. ज्यामध्ये स्वराज्य संघटनेने आपला उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीमध्ये एकीकडे सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील आणि त्या व्यतिरिक्त आता सुरेश पवार (Suresh Pawar) अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे.
यावेळी सुरेश पवार म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघात सुशिक्षित मतदार आहेत. आजच तुम्ही राजकारण बघितलं तर कुठल्या पक्षाला उमेदवार देता आला नाही. जे चेहरे होते यांना जीकडे तिकडं ओढून तोडून हे आपली उमेदवारी करण्याचा प्रयत्न आहे. या निवडणुकीत काही चुरस म्हणणं योग्य वाटणार नाही. कारण जर बघितलं जसं ते औरंगजेबाच्या मुलाने वडिलांना गादीवरून उचलून बाजूला ठेवलं तशी गत इथं झाली आहे. एबी फॉर्म आपल्या हातात असताना सुद्धा मुलाने वडिलांचा मान राखला नाही. वडिलांना बाजूला करून त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला, तरी त्यांना अजून कोणाचा पाठिंबा मिळवता आला नाही. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत चुरस वाटत नसल्याचे अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, नाशिक मतदारसंघात सुज्ञ मतदार असून त्यांना सगळ्या गोष्टींची जाण आहे. तुम्ही या मतदारांना विकत घेऊ शकत नाही. हे मतदार योग्य पद्धतीने मतदान करून एक चांगला सुसंस्कृत प्रतिनिधी निवडण्याचे ते काम करतील. त्याचबरोबर उमेदवाराचा कर्तव्य आहे की मतदाराकडे जाणं, मतदान मागणं. त्यांना आपली भूमिका समजावून सांगणं. ज्या पद्धतीने स्वराज्य संघटना हा आमचा आधारस्तंभ आहे. परंतु जे राजकीय पक्ष असतील, त्यांनाही विनंती करणार असून चांगल्या पद्धतीने मतदान करा. सुसंस्कृत राजकारण करण्याच्या पुढील वाटचालीत काम करतोय. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडे जाऊन मतदान मागू शकतो, अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
संभाजीराजे छत्रपती प्रचाराला येतील?
त्याचबरोबर नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणताही बलाढ्य उमेदवार नाही, मतदार हा बलाढ्य आहे. आम्ही मतदारांपर्यंत पोहोचतोय. मागील वीस जे सामाजिक काम केले आहे, ते मतदारांना समजावून सांगत आहोत. मागील निवडणुकीत देखील जुन्या पेन्शन योजनेवर काढली, मात्र हा प्रश्न देखील सहा वर्षात सोडवता आला नाही. मतदार हे ओळखत असल्याने ते योग्य उमेदवार निवडतील. आमच्या प्रचाराला संभाजीराजे छत्रपती येतील का नाही, हे माहित नाही. परंतु महाराज एवढे निश्चित जाणकार आहेत, की काय केलं पाहिजे. त्यांनी या राजकारणात जो पाठिंबा दिला, तो याच दृष्टीने दिला की सध्याचा राजकारण त्यांनी बघितलं आहे. सध्याचे राजकारण कोणत्या स्थितीला जात आहे. एक सुसंस्कृत राजकारणाची जर नांदी आणायची असेल तर आपण कुठेतरी हस्तक्षेप केला पाहिजे. या दृष्टीने त्यांनी मला पाठिंबा दिल्याचे उमेदवार सुरेश पवार यांनी सांगितले.