Nashik ACB Raid : नाशिकच्या (Nashik) आदिवासी विभागातील (Tribal Department) लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल (Dineshkumar Bagul) यांना काल एसीबीने 28 लाखांची लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहाथ पकडले. बागुल यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांत नाशिकमधून दोन बड्या अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे. यात सर्वाधिक लाच घेणाऱ्यांमध्ये आदिवासी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या दिनेश कुमार बागुल यांनी स्थान पटकावले आहे. काल पासून सुरू असलेल्या झाडाझडतीत बागुल यांच्या नाशिकच्या (Nashik) घरातून 98 लाख 63 हजार तर पुण्यातील घरी 45 लाख 40 हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे (Pune) अशा दोन्ही ठिकाणाहुन एक कोटी 44 लाखांची कॅश सापडली असल्याची माहिती आहे. ही पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर केला करण्यात आला.
दरम्यान बागुल यांना अटक केल्यानंतर त्यांच्या नाशिक, पुणे, धुळे आदी घरांवर धाडसत्र टाकत कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या लाचखोर अभियंत्यास आज न्यायालयात हजर केले असता त्याला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बागुल याच्याकडे आणखी करोडो रुपयांचे घबाड सापडण्याची शक्यता असल्याने एसीबीने (ACB) त्याच्या अधिक चौकशीसाठी रिमांड मागितला होता. त्यामुळे न्यायालयाने बागुलला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लाच घेण्याचे प्रमाण वाढले...!
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील (Nashik News) लाचेच्या प्रकरणांत (Bribe Case) वाढ झाली आहे. काल आरोग्य विभागाच्या (Health Deaprtment) उपसंचालकांचे लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असताना आज आदिवासी विकासच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला विभागाने ताब्यात घेतले आहे. गेल्या 15 दिवसांपासून एसीबी बागूलच्या मागावर होते. सेंट्रल किचनच्या (Central Kitchen) कामासाठी 12 टक्के दराने लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
नाशिकचे बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
दरम्यान आदिवासी विकास विभागात बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या दिनेशकुमार बागुल यांनी 28 लाखांची लाच मागितली. याप्रकरणी त्यांना काल दुपारी अटक करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांना 8 लाखांच्या लाचप्रकरणी करण्यात अटक आली होती. मात्र बागुल यांनी तब्बल 28 लाखांची लाच मागितल्याने लाचखोरी प्रकरणात नाशिकमध्ये त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष कालच एका क्लास वन अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहाथ पकडले होते, ती घटना ताजी असतानाच बागुल यांच्यावर एसीबीची धाड पडली.