Nashik News : अंजनेरीचा हनुमान जनस्थळावरून काल वादळी सभा अनुभवयास मिळाली. या सभेत महंतांनी गोविदानंद महाराज यांच्यावर माईक उगारल्याचा व्हिडिओ चर्चेत होता. याच माईक उगारणाऱ्या महंतांची भुजबळांकडून नक्कल करण्यात आली आहे. तसेच अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे वक्तव्यही छगन भुजबळांनी यावेळी केले. 


नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. या वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित शास्रार्थ सभा देखील गुंडाळण्यात आली. मात्र शास्रार्थ सभेत साधू महंतांची हमरी तुमरी चर्चेचा विषय झाली. यात स्थानिक महंत सुधीरदास यांनी गोविदानंद महाराज यांच्यावर माईक उगारला. यावरून साधू महंतांमध्ये चांगलेच रान पेटल्याचे पाहायला मिळाले.  


दरम्यान राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित होते. यावेळी त्यांना एका पत्रकाराने अंजनेरीच्या वादासंदर्भात प्रश्न विचारला. यावेळी ते बूम उचलून म्हणाले' बार बार कॉन्ट्रोवर्सी कि बात मत करो' .. पुढे जाऊन एका पत्रकाराने पुन्हा अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थळा संदर्भात प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी समोरील बूम उचलून उगारला. म्हणाले कि, तुम्हाला त्याबद्दल काही शंका आहे, हनुमानाचे जन्मस्थान हे अंजनेरीच्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


अंजनेरी हनुमान जन्मस्थळ वादाचं पुढं काय? 
गेल्या काही दिवसांपासून अंजनेरीच्या हनुमान जन्मस्थळाबाबतचा वाद चांगलाच पेटला होता. शास्रार्थ सभेतील गोंधळ, मानापमान नाट्य,साधू महंतांची हमरी तुमरी यामुळे शास्रार्थ सभा झालीच नाही. शिवाय हनुमान जन्मस्थळ वाद बाजूलाच राहिला. त्यानंतर आज गोविदानंद महाराज यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे सांगून गुजरातकडे रवाना झाले. मात्र अंजनेरी हनुमान जन्मस्थळ वादाचं पुढं काय असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. 


गोविंदानंद महाराज गुजरातला रवाना 
नाशिकरोड येथील सिद्धपीठ आश्रम येथे झालेल्या शास्रार्थ सभेच्या गोंधळानंतर किष्किंधाचे गोविंदानंद महाराज यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत हनुमानाचा जन्म हा अंजनेरी नसून किष्किंदा नगरी आहे. सरकारचा पुरावा दाखवून अंजनेरी जन्मस्थळ सिद्ध होत नाही. त्यामुळे येथील धूर्त लोकांशी पुन्हा चर्चा काय करणार? असा सवाल त्यांनी यावेळी  उपस्थित केला. दरम्यान पत्रकार परिषदेनंतर ते गुजरातला रवाना झाले आहेत.