Nashik Hanuman Birth Place : ब्रह्मपुराणानुसार हनुमानाचा जन्म किष्किंदानगरीतच झाला असून वाल्मिकी रामायणामध्ये याचा उल्लेख असल्याचा दावा गोविदानंद महाराज यांनी केला आहे. गोविदानंद महाराज यांनी आज पत्रकार परिषद घेत आपण हनुमान जनस्थळाच्या दाव्याबाबत ठाम असल्याचे संगितले. तर पत्रकार अपरिषदेनंतर गोविदानंद महाराज हे गुजरातला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
नाशिकमध्ये शास्रार्थ सभेत झालेल्या गोंधळानंतर गोविदानंद महाराज पत्रकार परिषद घेतली असून या परिषदेत त्यांनी आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे सांगितले. यावेळी रामजन्मभूमीचे प्रधानाचार्य पथक, अनिकेत शास्त्री यांच्यासह इतर साधू महंत यावेळी उपस्थित होते. नाशिकरोडच्या सिद्धपीठ आश्रमात शास्रार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या शास्रार्थ सभेत साधू महंत एकमेकांशी भिडले होते. एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि त्यामुळे एकूणच वादाची पार्श्वभुमी शास्रार्थ सभेला मिळाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गोविंद सरस्वती पत्रकार परिषद घेतली. यावेळी सदर सिद्धपीठ आश्रमाच्या आवारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले.
पत्रकार परिषदेत गोविदानंद महाराज यांनी ब्रह्मपुराणानुसार हनुमान जन्मस्थळ हे अंजनेरी नसून किष्किंदा नगरी आहे. याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही कधीही चर्चेला बोलवा आम्ही हजर राहू, सरकारचा पुरावा दाखवून अंजनेरी जन्मस्थळ सिद्ध होत नाही. त्यासाठी धर्मग्रंथांचा आधार असणं आवश्यक आहे. या पत्रकार परिषदेत गोविदानंद महाराज यांनी मांडलेल्या भूमिकेवरून ते आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान पत्रकार परिषदेनंतर गोविदानंद महाराज गुजरातला रवाना होणार आहेत.
चर्चेतून वाद मिटेल
दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित रामजन्मभूमीचे प्रधानाचार्य पाठक यावेळी म्हणाले कि, हनुमान जन्मस्थळ हे अंजनेरी नसून किष्किंदा नगरी आहे. त्यामुळे वाद करण्यात अर्थ नाही. मात्र चर्चेला आलं पाहिजे. चर्चेतून हा वाद सोडवला जाईल. वाद करून काहीही साध्य होणार नाही.
गोविंदानंद महाराज संतापले..
नाशिकरोड येथील सिद्धपीठ आश्रम येथे झालेल्या शास्रार्थ सभेच्या गोंधळानंतर किष्किंधाचे गोविंदानंद महाराज संतापले. ते म्हणाले, सरकारचा पुरावा दाखवून अंजनेरी जन्मस्थळ सिद्ध होत नाही. त्यामुळे येथील धूर्त लोकांशी पुन्हा चर्चा काय करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्याने माझ्यावर माईक उचलला त्यांचीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे त्यांनी सांगितले. एक पुस्तक दाखवून मी हे सगळ्यांना सिद्ध करून दाखवेल की किष्किंदा हेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे. शिवाय हनुमान जन्मस्थळ वाद एका दिवसांत संपुष्ठात येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.