Chhagan Bhujbal : किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांना क्लिनचिट दिली, या विषयी फारशी माहिती नाही, मात्र सरकार त्यांचे आहे, त्यामुळे झाले असावे अशी खोचक प्रतिक्रिया छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीनचीट दिली आहे. या प्रश्नावर भुजबळांनी उत्तर देताना राज्य सरकारला टोला लगावला आहे. 


नाशिकमध्ये (Nashik) भुजबळ फार्मवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान आज सकाळी किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने क्लिनचिट दिल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी भुजबळांनी मला याबद्दल फारशी माहिती नसल्याचे सांगत सरकार त्यांचे आहे, त्यामुळे झाले असावे अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. ते पुढे म्हणाले, अमित शहा यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलावले चांगले गोष्ट असून दोघांनी एकमेकांच्या गावांवर हक्क सांगू नये हे ही चांगले आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई बोलत असताना जशास तसे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे होते.  या घटनांचा खोलात जाऊन अभ्यास केला आणि कोर्टाच्या बाहेर काही तडजोड केली, तर मार्ग निघू शकतो. यासाठी तटस्थ लोकांची नियुक्ती करायला हवी. शिवाय दोन्ही राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्याचबरोबर कानडीकरन सक्तीचे केले जात असल्याचा आरोप भुजबळांनी यावेळी केला. 


तसेच 17 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. टाय पार्श्वभूमीवर मोर्चाला परवानगी दिलीच पाहिजे. गृहमंत्री फडणवीस यांनी लक्ष घालावे. अशा पद्धतीने राजकरण सुरु आहे, त्यामुळे वाटत कि राज्यात अघोषित इमर्जन्सी सुरू आहे. एकतर गृहमंत्र्यांनी परवानगी देऊ नये असे सांगितले असेल किंवा पोलीस देत नसतील तर त्यांनी हस्तक्षेप करावा. महापुरुष यांच्यावर होणाऱ्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ मोर्चा आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यात उद्योग जात आहेत, त्या विरोधात मोर्चा आहे. त्यामुळे कारवाई झाली तरीही चालेल मोर्चा निघणार असा इशारा भुजबळांनी दिला. 


दरम्यान फ्रॅक्चर्ड फ्रिडम (Fractured Freedom) या पुस्तकावरून सुरु असलेल्या वादावर बोलताना भुजबळ म्हणाले, अनघा लेलेंचे अनुवादित पुस्तक आहे. त्यामुळे पुरस्कार नाकारला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घातले पाहिजे. पुरस्कार रद्द करणे म्हणजे आबैल मुझे मार असे आहे. मात्र नक्षलवादाला आमचा मुळीच पाठींबा नाही, पण असा पुरस्कार रद्द करणे योग्य नाही. दुसरीकडे काल जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागातील शेतीला फटका बसला असून अवकाळी पावसाची मागची नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना दिली नाही, आता पुन्हा अवकाळी पाऊस सुरू आहे, त्यामुळे हा मुद्दा आम्ही हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे ते म्हणाले.