Nashik Water Dam : नाशिक (Nashik) जिल्ह्याला नैसर्गिक वरदान लाभले असल्याने पर्यटकांना नेहमीच भुरळ असते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात धरणाच्या बाजूला पर्यटकांची मांदियाळी असते. मात्र याचा फायदा घेत हॉटेल्स रिसॉर्ट (Resort) चालकांनी बस्तान उभे केले आहे. धरणालगतच्या जागांना त्यामुळे सोन्याचे भाव प्राप्त झाले असून धरणाचे बॅक वॉटर लगतच्या टेकड्या, डोंगराचा पायथा अशा मुख्य जागांवर रिसॉर्ट उभे राहिल्याने त्यातून धरणाच्या सुरक्षिततेला तसेच धरणातील पाण्याचे प्रदूषण (Water Pollution) होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने धरण क्षेत्रात 200 मीटर परिसरात बांधकामांना बंदी घातल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 


सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात लहान मोठे असे सुमारे 24 धरणे (Dams) असून अलीकडच्या काळात पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आदी भागातील निसर्ग सौंदर्य भरभरून असल्याने या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. त्याचबरोबर गंगापूर धरण, भावली धरण, मुकणे धरण, दारणा धरण, पालखेड धरण, कश्यपी डॅम आदी परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात त्याच बरोबर इतर दिवशी देखील पर्यटकांच्या सहली या ठिकाणी पाहायला मिळत असतात. याच माध्यमातून स्थानिक तसेच मुंबई पुण्यातील व्यावसायिकांनी या ठिकाणी रिसॉर्ट उभारण्याचा सिलसिला सुरू केला आहे. धरणालगची मोक्याची जागा हेरून हे व्यावसायिक बांबूच्या लाकडांनी रिसॉर्ट उभे करत आहेत. धरणाच्या काठालगत रिसॉर्ट उभे राहिल्याने अनेक पर्यटक पर्यटनासह मद्य व इतर गोष्टीवर आकर्षिले जातात. यातून अनेकदा मात्र यातून अनेकदा अनुचित प्रकार घडल्याचे समोर येतात. 


धरण क्षेत्राला लाभलेले निसर्गसौंदर्य पाहता अलीकडच्या काळात धरणाच्या परिसरातच रिसॉर्ट फार्म हाऊस बांधण्याकडे कल वाढला आहे. निर्जन भागाला पर्यटकांची पसंती असल्याने रिसॉर्ट फॉर्मची संख्या दरवर्षी वाढत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अलीकडे धरणांची सुरक्षितता जलजीवांची काळजी लक्षात घेऊन धरणाच्या वरच्या क्षेत्रात 200 मीटर पर्यंत बांधकामांना बंदी घातली आहे. त्यामुळे बऱ्यापैकी रिसॉर्ट फार्म हाऊस क्षेत्राला त्यामुळे चाप बसणार आहे. 


रिसॉर्टचे सांडपाणी थेट धरणात 
दरम्यान नाशिक जिल्हयातील अनेक भागातील धरणाच्या जवळ रिसॉर्ट. हॉटेल्स उभी राहिली आहेत. या रिसॉर्टमध्ये नाईट पार्टी किंवा पर्यटकांना इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.  त्याचप्रमाणे रिसॉर्टचे इतर व्यवस्थापन बघता सांडपाण्याचा निसरा स्वतंत्रपणे करण्याची सोय नसल्यामुळे ते पाणी थेट धरणात सोडले जाते. ते नियमाला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. धरणाचे वरच्या बाजूला 200 मीटर बांधकामाला बंदी घालण्यात आली आहे. फक्त धरण क्षेत्रालगतचा अंतराचा दाखला दिला जातो अशी माहिती पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली.