Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्याचे (Ambad Police Station) पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्यामार्फत एका महिन्याच्या आत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल आणि तेथे मुदत संपूनही कार्यरत असलेल्या पोलीस नाईक प्रशांत नागरे यांची बदली करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. विधानसभा सदस्य नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. 


नाशिक जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्यामार्फत एका महिन्याच्या आत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल आणि तेथे मुदत संपूनही कार्यरत असलेल्या पोलीस नाईक प्रशांत नागरे यांची बदली करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात सदस्यांनी सभागृहात व्यक्त केलेल्या भावना विचारात घेऊन त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. एका महिन्यात याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल. अंबड पोलिस स्थानक: प्रशांत नांगरे यांना दिलेली मुदतवाढ तत्काळ संपुष्टात आणण्यात येईल. पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची एक महिन्यात ADG दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल.


सिडको परिसरातील अंब़ड औद्योगिक परिसरातील बंद करण्यात आलेला भंगार बाजार पोलिसांच्या वरदहस्तामुळे पुन्हा सुरु करण्यात आल्याने टोळी युध्द, अवैध धंदे दिवसरात्र सुरु झाले होते. अशा गावगुंडांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना नेहमी आश्रय दिला जात असल्याचे आरोप सामान्य नागरिकांकडून सर्रास केले जात होते. पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख तक्रारदारांकडे लाच मागतात, अवैध धंदे करणाऱ्यांकडून त्यांना हप्ते दिले जातात. यामध्ये पोलीस नाईक प्रशांत नागरे हा सामान्य नागरिकांवर दादागिरी करीत दहशत पसरवीत आमचे कोणीही काहीही करू शकत नसल्याचे सांगत वसुली करीत असून, देशमुख आणि नागरे यांनी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात माया जमवली असून त्यांच्याकडील मालमत्तेची एसआयटी किंवा सीआयडी मार्फ़त चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आ. राणे यांनी केली.


दरम्यान या लक्षवेधीवर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि, पोलीस नाईक प्रशांत नागरे यांचा अंबड पोलीस ठाण्यातील कार्यकाळ संपला असून देखील त्याला बेकायदेशीररीत्या वाढीव मुदत देण्यात आल्याने त्याची बदली करण्यात येईल. तसेच, अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्यामार्फत एका महिन्याच्या आत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.