Nashik Onion Issue : लाल कांद्याला (Red Onion) मागणी नाही, नाफेड आजपर्यंत लाल कांदा खरेदी करत नव्हते. परंतु पहिल्यांदाच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांसाठी लाल कांदा नाफेड खरेदी करत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे. शेतकरी संघटनेने लेखी द्यावं, आम्ही नाफेडची खरेदी बंद करू असा गंभीर इशारा देखील मंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी यावेळी दिला.


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील (Niphad) शिरसगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री मंत्री डॉ. पवार आल्या होत्या. यावेळी मंत्री डॉ. पवार व शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे हे दोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या भावात (Onion Issue) सतत घसरण होत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून रोज कुठे न कुठे आंदोलन केले जात आहे. या प्रश्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज नाफेडला भेट देऊन कांदा खरेदी बाबत आढावा घेतल्यानंतर त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी निफाडच्या शिरसगाव येथे कांदा भाव घसरणी बाबत शेतकरी संघटनेच्या पदाधिकासऱ्यांनी मंत्री भारती पवार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कांदा भाव घसरणीत राजकारण आणू नका केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. 


नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याचे बाजार भाव कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराज यांनी संतापच वातावरण आहे. यातूनच केंद्र व राज्य सरकार विषयक असंतोष निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. निफाड दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनाही शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे शेतकरी संघटनेने नाफेडच्या कांदा खरेदी वरून मंत्री डॉ. पवार यांना घेराव घातला यावेळी शेतकरी आणि मंत्र्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची ही झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याचे निर्माण झाला होता.


लाल कांदा हा जास्त टिकत नाही.... 


यावेळी भारती पवार म्हणाल्या की, लाल कांद्याला मागणी नाही. नाफेड आजपर्यंत लाल कांदा खरेदी करत नव्हते. परंतु पहिल्यांदाच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांसाठी लाल कांदा नाफेड खरेदी करत आहे. नाफेडच्या खरेदीमुळे भाव वाढतात स्पर्धा तयार होते. नाफेड शेतकऱ्यांसाठीच आहे, असे मंत्री भारती पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितले. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे. शेतकरी संघटनेने लेखी द्यावं, आम्ही नाफेडची खरेदी बंद करू असा गंभीर इशारा देखील मंत्री डॉक्टर पवार यांनी यावेळी दिला.


नाफेडची खरेदी काही कामाची नाही... 


नाफेडने जागतिक बाजारभावाप्रमाणे कांदा खरेदी करावी खरेदी केलेला कांदा बाजारात न आणता तो समुद्रात बुडवावा अशी संतप्त मागणी ही शेतकऱ्यांनी केली. शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे यांनी नाफेडची कांद्याची खरेदी ही चुकीच्या पद्धतीची असल्याचे सांगत शेतमाला भाव नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. नाफेडची खरेदी ही काही कामाची नसून ती जागतिक पातळी प्रमाणे झाली पाहिजे. गोष्ट बाचाबाचीवर आल्याने भाजपचे युवा नेते ओझरचे येथील कदम यांनी मध्यस्थी करत ताईंना दिल्ली फ्लाईट आहे, या विषयावर पुन्हा आपण स्वतंत्र चर्चा करू असे सांगत काढता पाय घेतला.