Nashik APMC Election : नाशिक (Nashik) बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकांमध्ये (Bajar Saiti Election) अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून अनेक नेत्यांकडे अनेक वर्षांपासून या बाजार समित्या असल्याने नेत्यांनी चांगलाच जोर लावलेला दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. जिल्ह्यातील दादा भुसे, छगन भुजबळ, सुहास कांदे, दिलीप बनकर, देविदास पिंगळे, माणिकराव कोकाटे आदी नेते बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. 


नाशिकसह बारा बाजार समिती निवडणुकीची (Nashik Bajar Samiti) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी आठ वाजेपासून या निवडणुकीला मतदानाला सुरुवात झाली असून हळूहळू मतदानाला मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत अनेक चुरशीच्या निवडणूक पाहायला मिळत आहे. विधानसभेची (Vidhansabha) रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 14 बाजार समिती आहेत, मात्र त्यामध्ये सुरगाणा बाजार समिती (Surgana Bajar Samiti) ही बिनविरोध झालेली आहेत तर मनमाड साठी 30 एप्रिलला मतदान होणार आहे. सद्यस्थितीत 12 बाजार समित्यांमधील 223 जागांसाठी 537 उमेदवार हे रिंगणात आहे. त्यासाठी 30 हजार मतदार आहेत तर 110 मतदान केंद्र हे प्रशासनाकडून उभारण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात पिंपळगाव वगळता इतर ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना अशी थेट लढत ही होणार आहे. तर पिंपळगावमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट अशी लढत ही बघायला मिळत आहे. 


त्यामध्ये पिंपळगाव बसवंत, लासलगाव, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, कळवण आणि देवळा या चुरशीच्या बाजार समिती आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे असतील, माजी पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, राष्ट्रवादीचे दिलीप बनकर, देविदास पिंगळे, माणिकराव कोकाटे, जयदत्त होळकर या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. यातील अनेक बाजार समितीचे चित्र आज स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे मतदार कोणाच्या कौल टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


जिल्ह्यातील चुरशीच्या निवडणुकांमध्ये  पिंपळगाव बसवंत, लासलगाव, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, कळवण, देवळा बाजार समितीकडे विशेष लक्ष आहे. आज नाशिक, मालेगाव, मनमाड, येवला, नांदगाव, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, चांदवड, कळवण, दिंडोरी, घोटी, सुरगाणा, देवळा बाजार समितीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आहे. तर आजच घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, सिन्नर, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समित्यांचा निकाल जाहीर होणार आहे. तर चांदवड, येवला, मालेगांव, लासलगाव उद्या निकाल जाहीर होणार आहे. तर येवला, मालेगाव, नांदगाव, लासलगाव, कळवण बाजार समितीमध्ये इंटरेस्टिंग लढती होत आहेत. 


कोणाची प्रतिष्ठा पणाला? 


पिंपळगाव बसवंत - राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर, ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम 
मालेगाव - अद्वय हिरे, मधुकर हिरे 
सिन्नर - राष्ट्रवादी आमदार माणिकराव कोकाटे, ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे
लासलगाव - सुवर्णा जगताप, जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे
येवला - उषा माणिकराव शिंदे, भास्करराव कोंढारे, मोहन शेलार 
कळवण - रवींद्र बाबा देवरे ( मविप्र संचालक ), धनंजय पवार ( विद्यमान सभापती ) 
मनमाड - माजी आमदार संजय पवार, गणेश धात्रक...


कोणत्या नेत्या विरुद्ध कोणता नेता?


लासलगाव - जयदत्त होळकर विरुद्ध पंढरीनाथ थोरे
येवला - आ.छगन भुजबळ विरुद्ध आ.नरेंद्र दराडे, माणिकराव शिंदे
नांदगाव - आ.सुहास कांदे विरुद्ध पंकज भुजबळ व इतर 4  माजी आमदार
मनमाड - आ.सुहास कांदे विरुद्ध पंकज भुजबळ व इतर 4 माजी आमदार
मालेगाव - मंत्री दादा भुसे विरुद्ध शिवसेना उपनेते अद्वय हिरे
कळवण - आ.नितीन पवार विरुद्ध रवींद्र देवरे, जे.पी.गावित
चांदवड - आ.राहुल आहेर विरुद्ध माजी आमदार शिरीष कोतवाल, उत्तमबाबा भालेराव
देवळा - डॉ.राहुल आहेर, केदार आहेर विरुद्ध नितीन आहेर ( यापूर्वी आठ जागा बिनविरोध)