Nashik News : रुग्णवाहिका म्हटलं अपघातसमयी धावून येणारी, वेळेवर जीव वाचविणारी, रुग्णाला आधार देणारी जीवन वाहिनी म्हणजेच रुग्णवाहिका होय. हीच रुग्णवाहिका चालवणाऱ्या चालकावर स्वतःचा मुलाचा मृतदेह नेण्याची वेळ आली तर? दचकलात ना? अगदी खरं ऐकलंत तुम्ही.... असा कुणासोबतही होऊ नये, मात्र नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.


एखाद्या रस्त्यावर अपघात झाला कि पहिल्यांदा रुग्ण वाहिलेला कॉल केला जातो. त्यानंतर नातेवाईक, पोलीस आदींनी घटनेची माहिती दिली जाते. कारण त्या माणसाचा जीव वाचणे महत्वाचे असते. पण सटाणा शहरात घडलेली घटना मात्र विचार करायला भाग पडणारी आहे. झालंही असंच. सटाणा शहरातील यशवंतनगरजवळ दुचाकी अपघातात तरुण गंभीर जखमी झालेला होता. यावेळी हि घटना काही तरुणांच्या निदर्शनास आली. जखमी तरुणास रुग्णालयात हलविणे महत्वाचे असल्याने या तरुणांनी तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कळविले. 


दरम्यान 108 या रुग्णवाहिकेला कॉल केल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहचले. अशावेळी घटनास्थळी एकदम धावपळ, आरडा ओरड सुरु असते. त्यामुळे रुग्ण वाहिका चालक गही करून जखमींना रुग्णालयात दाखल करता. ही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्यानंतर चालक जखमी युवकाजवळ गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण जखमी अवस्थेतील मुलगा हा दुसरा तिसरा कोणी नसून त्या रुग्णवाहिका चालकाचा मुलगाच होता. आपलाच मुलगा असल्याचे कळताच त्यांना धक्का बसला. 


घटनास्थळी आपल्या मुलाला पाहून त्या बापाचं अवसान गळालं होत. मात्र मुलाला वाचविणं महत्वाचं होत. त्यांनी धीर खचू न देता त्याला इतरांच्या मदतीने रुग्णवाहिकेत टाकण्याचा प्रयत्नही केला. मात्र दुर्दैव असं कि, रुग्णांचा जीव वाचावा म्हणून सतत वेगाशी स्पर्धा करणाऱ्या या चालकास त्याच्याच मुलाला रुग्णालयापर्यंत नेण्याचीही संधी नियतीने दिली नाही. गंभीर जखमी असलेल्या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या वडिलांनी तेथेच टाहो फोडला. यावेळी खैरनार जागेवरच कोसळल्यामुळे त्यानंतर कल्पेश निकम या रुग्णवाहिका चालकाने सागरचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेला. 


सटाणा शहरातील यशवंतनगर जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सागर श्रावण खैरनार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. यशवंतनगर येथे अपघाताचा झाल्याचा आवाज होताच तेथील युवकांनी रस्त्यावर धाव घेतली. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला होता तर सागर हा दूरवर फेकला गेला होता. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहताच युवकांनी क्षणाचाही विलंब न करता सटाणा पोलिसांना आणि 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कळविले. 


होता मुलाचाच मृतदेह 
रुग्णवाहिका चालक श्रावण खैरनार त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. जखमी युवकाचा उचलण्यासाठी त्याच्या जवळ जाताच त्यांना मोठा धक्का बसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जखमी युवक आपला सागर असल्याचे कळताच ते जमिनीवरच कोसळले. अपघातातील जखमी रुग्णांचा जीव वाचावा यासाठी जीवाचे रान करून सतत धावपळ करणाऱ्या खैरनार यांना मात्र स्वत:च्याच मुलाला रुग्णालयापर्यंतही नेण्याची संधी न मिळाल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. सागर जागीच मृत झाल्याचे कळताच त्याच्या वडिलांनी त्याच्या मृतदेहाजवळच हंबरडा फोडला.


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.