Nashik Sharad Pawar : अजित दादा मुख्यमंत्री (Ajit Pawar) व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शरद पवार हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. काही दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. आमदार निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) जाहीरपणे असं वक्तव्य देखील केले आहे, की अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यामुळं कामाला लागा. यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून संख्याबळ नसल्याने ते शक्य नसल्याचे म्हटले आहे. अजित दादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले की, अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री पदी आवडतील मात्र शेवटी संख्या असली पाहिजे, आज आमच्याकडे संख्या नाही, आमच्याकडे संख्या असती तर सगळ्या पक्षांना विचारात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. आज आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाला खुद्द शरद पवार यांनीच उत्तर दिले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच आणि तेही अजितदादाच असं जाहीरपणे बोलून दाखवलं होत. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, त्यासाठी कामाला लागा असं आवाहन निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांना केले होते. विशेष म्हणजे निलेश लंके ज्यावेळी बोलत होते त्यावेळी अजित पवारही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच अजित पवारांना आपल्याला मुख्यमंत्री करायचंय असं लंके म्हणाले होते.
आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर....
मुंबई मनपाची निवडणूक पाहून मोदी महाराष्ट्रात येत आहेत, हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काही हरकत नाही, पण ते येऊन राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा. तसेच नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झाला, आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, पटोलेंनी राजीनामा देतांना सगळ्यांना विश्वासात घेतले नाही, एवढीच व्यथा पण आता तो विषय संपला असल्याचे पवार म्हणाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित दादा मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवत आहेत. यावर पवार म्हणाले की, अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता. आज आमच्याकडे शक्ती नाही, त्यामुळे सध्या शक्य नसल्याचे शरद पवार म्हणाले.