Nashik Saroj Ahire : देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी मतदार संघातील विकास कामांसाठी निधीची मागणी केली असता पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 40 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तीनच दिवसापूर्वी आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी अंतर्गत देवळाली मतदारसंघासाठी 40 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय फलदायी
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon session) सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी देवळाली मतदारसंघाकरता (Deolali Assembly) पुरवण्या मागण्या अंतर्गत 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थ खाते असल्याने देवळाली मतदारसंघात पुढच्या काही दिवसांमध्ये भरघोस निधी मिळण्याची शक्यता आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात विकासाची कामे मार्गी लागणार असल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. 'साहेब' की 'दादा' यापैकी कोणत्या गटात जायचे, याबाबत संभ्रमावस्थेत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या dcm Ajit Pawar) गटात जाण्याला पसंती दिली आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दवशी त्यांच्या देवळाली मतदारसंघासाठी तब्बल 40 कोटींचा निधी मंजूर झाला.
आमदार सरोज अहिरे यांना 40 कोटींचा निधी
आमदार आहिरे यांनी तीनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाचेत जाण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीच्या तिन्ही अधिवेशनात आमदार आहिरे यांना अवघा दहा कोटींचाच विकास निधी मिळाला होता. मात्र यंदाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चांगला निधी मिळाल्याचा दावा करीत त्यांनी अजित पवार गटात सहभागाचा निर्णय कसा योग्य आहे, याकडे लक्ष वेधले. मंजूर निधीत दहा कोटी आदिवासी भागातील विकास कामांसाठी आहेत. तर 25 कोटी हे मतदारसंघातील रस्ते, पूल, संरक्षक भिंत बांधणे तर उर्वरित 5 कोटी गिरणारे ग्रामीण रुग्णालयात (Girnare Hospital) विविध सोयीसुविधाकरिता निधी मिळाला आहे.
विकासाची कामे मार्गी लागणार
गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे आमदार सरोज अहिरे म्हणाल्या. पहिल्याच दिवशी देवळाली मतदारसंघासाठी पुरवण्या मागण्या अंतर्गत 40 कोटी मंजूर झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असल्याने देवळाली मतदारसंघात पुढच्या काही दिवसांमध्ये भरघोस निधी मिळण्याची शक्यता आहे. याद्वारे मोठया प्रमाणात विकासाची कामे मार्गी लागणार असल्याचे सरोज आहिरे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Ajit Pawar Nasik : नाशिकमध्ये अजित पवारांचं जल्लोषात स्वागत; आमदार सरोज आहिरे अजित पवार गटात