Nashik Accident News : सप्तशृंगी गडावरील (Saptshrungi Gad) बस अपघातातील जखमींवर शासनाच्या माध्यमातून उपचार केले जातील तर मृत महिलेच्या नातेवाईकांना एसटी महामंडळाकडून दहा लाख रुपयांची मदत केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिले आहे. दरम्यान या अपघातात 18 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या (Nashik Civil Hospital) जिल्हा रुग्णालयात 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. तर उर्वरित जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात (Vani Rural Hospital) उपचार सुरु आहेत. 


आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास सप्तशृंगी घाटात (Saptshurngi Gad) एसटी बसचा मोठा अपघात (Bus Accident) झाल्याची घटना घडली. सप्तशृंगी घाटातील गणपती पॉईंटजवळ बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात 1 महिला प्रवासी ठार झाली असून 18 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातातील चार जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अन्य अकरा महिलांसह 2 पुरुषांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार सुरु आहेत. जखमींवर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच जखमींवर शासनाच्या माध्यमातून उपचार केले जातील तर मृत महिलेला एसटी महामंडळाकडून दहा लाख रुपयांची मदत केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. 


दरम्यान अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरु झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरुन खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात होऊन बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अठरा प्रवाशी जखमी आहेत. तर सर्वाधिक जखमी प्रवाशी हे अमळनेर तालुक्यातील मुडी येथील आहेत. 


नाशिक जिल्हा रुग्णालयात 13 प्रवाशांवर उपचार 


तसेच जास्तीत जास्त रुग्ण हे नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा रुग्णालयात 15 बेड्स राखीव ठेवण्यात आले होते. आतापर्यंत नाशिक जिल्हा रुग्णालय 13 जखमी रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. तर काही जखमींवर वणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी हा अपघात झाला दाट धुक्यामुळे एका वळणावरुन कदाचित बस ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने मोठी जीवित हानी झाली नाही, एका महिला प्रवासाचा या अपघातात मृत्यू झाला असून बस चालक गंभीररित्या जखमी आहे.


हेही वाचा