Nashik Farmer : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) अनेक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याच्या घटना यापूर्वी देखील निदर्शनास आलेल्या आहेत. मात्र त्यानंतरही शेतकरी वर्ग व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवत असल्याने फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. अशातच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक शेतकऱ्यांची एक कोटींची फसवणूक (Fraud) झाल्याचे समोर आले आहे. 


नाशिक कृषी उत्पन्न बाजार (Nashik Bajar Samiti) समिती आणि पोलीस प्रशासनाकडून (Nashik Police) वेळोवेळी सूचना केल्या जातात की, ज्या व्यापाऱ्यास शेती माल देत असाल तर रोखीने व्यवहार करून रीतसर कागदोपत्री व्यवहार करावा, मात्र व्यापाऱ्यांवर विश्वास ठेऊन शेतकरी माल सुपूर्द करतात. अशांमुळे फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड वरील शरदचंद्र बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला टोमॅटो माल वेळोवेळी शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्या बदल्यात एक कोटी 80 लाख शेतकऱ्यांना न देता दोघे व्यापारी फरार झाल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे निवेदन देत पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला आहे.


नाशिक शहरातील पेठरोडवरील शरद पवार मार्केट यार्डात जिल्हाभरातील विविध भागातून टोमॅटो विक्रीसाठी येतो. टोमॅटो खरेदीदार व्यापाऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करून शेतकऱ्यांना टोमॅटो रक्कम अदा करतात. टोमॅटो व्यापारी (Tomato) नौशाद फारुकी व समशाद फारूकी यांनी गेल्यावर्षी सप्टेंबर 2022  ते ऑक्टोबर महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांकडून टोमॅटो माल खरेदी केला, मात्र त्याचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. शिवाय दोघा व्यापाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना धनादेश दिले होते ते धनादेश वटले नाहीत. संशयित दोघा व्यापाऱ्यांकडून जवळपास 179 शेतकऱ्यांना सुमारे एक कोटी 80 लाख रुपये देणे बाकी आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित व्यापाऱ्याकडे पैसे मागत होते. मात्र ते पैसे देण्यास टाळत होते. 


व्यापाऱ्यांच्या गाळे व मालमत्ताचा लिलाव 


गेल्या काही दिवसापासून फरार झाले असून शेतक-यांची फसवणूक झाल्याबाबत बाजार समिती सचिव अरुण काळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत व्यथा मांडत व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्याचे गाळे व मालमत्ता यांचे लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनास सदर प्रकरणी माहिती उपलब्ध झाली. व्यापायाने विकलेला गाळा ताब्यात घेत त्याची विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच सदर व्यापारी आपल्या खासगी बजावली आहे. 


पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 


सदर मिळकती विकत असल्याची माहिती बाजार समितीस मिळताच दस्त नोंदणी कार्यालयात पत्रव्यवहार करीत माहिती मागवली असून बाजार समिती कारवाई करणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. शेतकऱ्यांच्या पैसे मिळवून देण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याला बाजार समिती प्रशासनाने नोटीस बजावले आहे सदर व्यापाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात असून तक्रार दाखल केल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले आहे.