Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) शिरसोली येथे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत असंख्य तरुणांनी शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटात प्रवेश केला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गळ्यात शिवसेनेची मफलर टाकून तरुणांचा प्रवेश सोहळा पार पडला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.


सध्या राज्यात ठाकरे गट (Thackeray Sena)  विरुद्ध शिवसेना शिंदे गटात चांगल्याच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याचबरोबर राजकीय नेत्यांमध्ये (Political Issue) देखील टिळक करण्याचे काम सुरु आहे. तसेच एका गटाकडून दुसऱ्या गटात जाणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. अशातच उत्तर महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोजच जिल्ह्यातील विविध भागात दौरे होत असून विकासकामांचे उद्घाटन देखील करण्यात येत आहे. याचबरोबर जिल्ह्यातील अनेक युवावर्ग शिवसेना शिंदे गटात प्रवेश (Youth Joins Shiv Sena) करत आहे. 


12 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण तसंच भूमीपूजन सोहळा


जळगाव जिल्ह्यातील शिरसोली (Shirsoli) येथे मंत्री गुलाबराव पाटील यांचे एकूण 12 कोटी रुपयांची विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमीपूजन सोहळा पार पडला. यात गावासाठी महत्वाची म्हणजे 8 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा समोवश आहे. तसेच या कार्यक्रमात पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यापासून पिकांचे संरक्षण करावे म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात 30 झटका मशीनचेही (Zatka Machine) वाटप करण्यात आले. यावेळी गावातील शेकडो तरुणांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवासेनेचे शिवराज पाटील, शिरसोली येथील ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण काटोले यांची उपस्थिती होती. रामकृष्ण काटोले यांच्यासह ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य असा पुष्पहार घालून मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


शेतीपिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण 


दरम्यान जळगाव जिल्ह्यातील शिरसोली परिसरात असलेल्या शेतपिकाचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबत आणि होणाऱ्या नुकसानीबाबत निवेदन दिले होते. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि होणारे पीक नुकसान कमी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावात 30 सोलर झटका मशीन वाटप करण्यात येत आहे. सोलर फेन्सिंगमुळे वन्य प्राण्यांकडून होणारे पीक नुकसान कमी होण्यास मदत होईल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.