Minister Bhagwat Karad : कोरोनानंतर (Corona) आपली अर्थव्यवस्था (Economy) सुधारत असून महागाई आहे, पण जगातल्या तुलनेत आपल्याकडे महागाई (Inflation) कमी आहे. शिवाय अमेरिका (America), चीन (Chin) यांच्या महागाई दरापेक्षा आपल्या देशाची महागाई कमी असल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड (Minister Bhgawat Karad) यांनी केले आहे. 


मंत्री भागवत कराड हे नाशिकमध्ये (Nashik) दाखल असून भाजपा (BJP) पदाधिकाऱ्यांशी भेटी गाठी घेत असून भागवत कराड पत्रकार परिषद (Press Conference) त्यांनी भाजप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी  गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) शुभेच्छा देत भाजपच्या डबल इंजिन सरकारवर स्तुतीसुमने उधळली. महागाईवर बोलताना ते म्हणाले की, देशात कोरोनानंतर अर्थव्यवस्था सुधारत आहे. महागाई आहे, मात्र इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. महाराष्ट्र नाही तर देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. 


दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आले आहे. यावर कराड म्हणाले भाजपचे काही नेते राज ठाकरे यांना भेटले, मात्र काय समीकरण येणार माहिती नाही. तसेच पंकजा मुंढे यांच्या नाराजीवर कराड म्हणाले, पंकजा मुंडे नाराज नाही, केंद्रात सचिव पातळीवर काम करत आहेत. कालच दिल्लीत एक तास भेटल्याचे ते म्हणाले. आमदार नाही, मंत्रिमंडळ स्थान कसे मिळणार? आमदार नाही म्हणून पात्र नाही असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले असल्याचे माहिती मंत्री भागवत कराड यांनी दिली.


राज्यात डबल इंजिन सरकार
 2019 च्या वेळी जनतेच्या मनात जे सरकार होते, ते आता सत्तेवर आले आहे. यावेळी निवडणूक झाल्या तर शिंदे गट भाजप 200 पेक्षा जास्त जागा घेईल. मागील अडीच वर्षे वाया गेले, कोरोना मुळे राज्यमंत्री काय करत होते, तर माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत कुटुंब सांभाळत घरी बसले होते, असा खोचक टोला यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला लावला आहे. डबल इंजिन सरकार असून विकासाला महाविकास आघाडीमुळे ब्रेक लागला होता, तो दूर झाला आहे. त्यामुळे राज्यात विकास होणार असल्याचे ते म्हणाले.


डॉ. कराड जीएसटीवर म्हणाले...
ग्लोबल रिसेशनचे चिन्ह नाहीत, जे रिसेशन आले आहे ते कोरोना मुळे आले असून आता ते दूर होत आहे. जीसटी वाढतोय याचाच अर्थ महागाई कमी असून अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. दरम्यान निर्मला सीतारामन यांनी दोनच दिवसांपूर्वी याबाबत राज्यसभा लोकसभेत निवेदन केले आहे. तसेच सुट्या पोह्यांवर जीएसटी नसून तो ब्रँड वर आहे. पॅकेज करून विकले तर जीएसटी लागणारच असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.