Nashik Bribe : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात लाच (Bribe) घेणाऱ्या कमर्चाऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच नाशिक शहर (Nashik City Police) पोलिसांच्या दलातही लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांमध्ये आणखी एक लाचेचे (Bribe) प्रकरणे समोर आले आहे. 35 हजारांची लाच मागणाऱ्या दोन पोलिसांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. 


नाशिक जिल्ह्यातील नांदगाव (Nandgoan) पोलीस ठाण्यात तक्रारदाराचा जमा केलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच (Bribe) मागणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने सापळा रचत अटक (Arrested) केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनमध्ये जमा असलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 35 हजाराची लाच घेताना नांदगाव येथील पोलिसाला रंगेहाथ पकडण्यात आले. सुरेश सुरेश सांगळे, अभिजित उगलमुगले असे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. 


नांदगाव पोलिसांनी तक्रारदाराचा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनमध्ये जमा केला होता, तो सोडवण्यासाठी 35 हजारांची लाच शेळके यांनी मागितली होती, ती स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार पळशीकर, प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली, पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्ह्यालदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 


संपर्क साधण्याचे आवाहन 
एकीकडे गृह विभाग 'खाकीची प्रतिमा' सुधारण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी खाकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असल्याची बाब उघड झाली आहे. गेल्या वर्षभरात लाच लुचपत विभागाने अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


अशी झाली कारवाई 
नांदगाव येथील तक्रारदार यांचा ट्रॅक्टर नांदगाव पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला होता. तो सोडवण्याकरता संशयित सुरेश पंडित सांगळे यांच्या सांगण्यावरून अभिजीत कचरू उगमुघले याने 35 हजार रुपयांची लाच मागितली. यावरून तक्रारदार याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. यावरून पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक वाचक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने सापळा रचून दोघाही संशयितांना लाच स्विकारतांना अटक केली.