Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात पाथर्डी परिसरात एका पेट्रोल पंप महिला कर्मचाऱ्यावर अज्ञात व्यक्तीकडून तलवारीने वार (Knife Attack) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. 


नाशिकच्या पाथर्डी परिसरातील (Pathrdi Gaon) पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आले आहे. ही घटना नाशिकच्या पाथर्डी गावाजवळील वडनेर रोड येथील जाधव पेट्रोलियम पंपावर घडली आहे. आज दुपारच्या सुमारास एक अज्ञात व्यक्तीने कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला करत पळ काढला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.


दरम्यान हा धक्कादायक प्रकार पाथर्डी गाव शेजारील एका जाधव पेट्रोल पंप जाधव नामक पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या झाल्याने शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही महिला गेल्या अनेक दिवसांपासून या जाधव पेट्रोल पंपावर काम करत आहे. आज दुपारच्या सुमारास महिला कर्मचारी कार्यरत असताना अचानक अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने या महिलेवर सपासप वार केले. यावेळी तिने प्रतिकार करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र अज्ञात इसम वार करत होता. काही वेळानंतर त्याने पळ काढल्यानंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. भर दिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. हल्ला करणारा संशयित हा महिलेचा ओळखीचा इसम असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तसेच गेल्या चार महिन्यापासून जखमी महिला पाथर्डी गावाजवळील जाधव पेट्रोल पंपावर काम करत होती. घोटी येथील प्रमोद गोसावी यांचे तिच्याशी दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गेले सहा सात महिन्यांपासून तिने प्रेमसंबंध तोडले होते. याचा राग संशयित आरोपी प्रमोद प्रकाश गोसावी याला आल्याने आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हल्ला केला. 


आपसातील वादातून हल्ला 
गेल्या चार महिन्यापासून जखमी महिला पाथर्डी गावाजवळील जाधव पेट्रोल पंपावर काम करत होती. घोटी येथील प्रमोद गोसावी यांचे तिच्याशी दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गेले सहा सात महिन्यांपासून तिने प्रेमसंबंध तोडले होते. याचा राग संशयित आरोपी प्रमोद प्रकाश गोसावी यास आल्याने आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हल्ला केला. या दोघांमध्ये जुना वाद असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 


नाशिकला झालंय काय? 
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने कळस गाठला असून दिवसाढवळ्या हाणामारीच्या, दोन गटात वाद हे तर नित्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे घटनास्थळी दाखल झाले. जखमी महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. संशयित आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.