Malegaon Upper Collector Murder : मालेगावचे (Malegaon) तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे (Yashwant Sonawane) जळीत हत्याकांडाचा (Burning Case) अकरा वर्षानंतर निकाल लागला असून मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मच्छिन्द्र सुरवडकर, राजू शिरसाठ आणि अजय सोनवणे अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
ऐन प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला नाशिकला (Nashik) हादरवणारी घटना घडली होती. नाशिकसह संपूर्ण राज्यच या घटनेने हादरले होते. एकीकडे नाशिक सह राज्यात प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरु असताना नाशिकच्या मनमाडजवळील (Manmad) पानेवाडी शिवारात असलेल्या (Pane wadi Oil Project) इंधनाच्या अवैध अड्ड्यावर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यावेळी स्थानिक इंधन माफियांनी सोनवणे यांची जिवंत जाळून हत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी पोपट शिंदे, मछिंद्र सूरवाडकर, राजू शिरसाठ, अजय सोनवणे आणि कुणाल शिंदे यांचा समावेश होता. त्यापैकी या घटनेत पोपट शिंदे देखील भाजला होता. मुंबईत उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. तर कुणाल शिंदे हा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर बाल न्यायलायत खटला सुरु आहे.
दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीत हत्यांकाडाचा निकाल लागला असून मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाचे न्यायमूर्ती डी वाय गोंड यांनी तीन आरोपीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी मच्छिंद्र सुरवडकर, राजू सिरसाट आणि अजय सोनवणे या तिघां आरोपीना कलम 302 अंतर्गत आजीवन करावास, 353 अंतर्गत 2 वर्षे आणि कलम 506 अंतर्गत 7 वर्षे शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड केला आहे.
नाशिकच्या मनमाडजवळील पानेवाडी शिवारात मालेगांवचे अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे हे याठिकाणी सुरू असलेल्या तेलभेसळीच्या अड्ड्यावर छापा टाकण्यास गेले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे यांना स्थानिक पोपट शिंदे व त्याच्या साथीदारांनी अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले होते. यात अप्पर जिल्हाधिकारी सोनवणेयांचा मृत्यू झाला होता. तर पोपट शिंदे हा देखील गंभीर भाजल्याने उपचार घेत असताना मरण पावला होता. या प्रकरणात मनमाड पोलिसांनी पोपट शिंदे, कुणाल शिंदे, विकास शिंदे, दीपक बोरसे, राजेश शिरसाठ, सीताराम भालेराव, मच्छिंद्र शिरोडकर यांच्यासह अकरा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात नंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मोक्का लावला होता. संपूर्ण राज्याला हादरवणारी ही घटना 25 जानेवारी 2011 ला घडली होती.