Nashik CBI Raid : नाशिकच्या (Nashik) आदिवासी विकास विभागातील कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांना तब्बल 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयनेही (CBI) नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे.
नाशिकमध्ये जीएसटी विभागाचे (GST) अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात सापडले आहेत. नाशिकच्या सिडको कार्यालयामधून (Cidko Office) चंद्रकांत चव्हाणके (Chandrakant Chavhanke) यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक (LCB) विभागाने ही कारवाई केली आहे. नाशिकमध्ये सीबीआयने कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाची ही पहिलीच आणि अतिशय मोठी कारवाई आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लाचखोरीच्या (Bribe) घटना घडत आहेत. त्यातच दोन दिवसांत दोन मोठ्या अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे. काल आदिवासी विकासच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला विभागाने ताब्यात घेतले आहे. गेल्या 15 दिवसांपासून एसीबी बागूलच्या मागावर होते. सेंट्रल किचनच्या कामासाठी 12 टक्के दराने लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरूच असताना नाशिकच्या सीबीआयच्या पथकाने जीएसटी अधिकाऱ्यास ताब्यात घेत कारवाई केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमधील वस्तू व सेवा कर (GST Office) विभागाचे कार्यालय आहे. एक राज्य सरकारचे आहे तर दुसरे केंद्र सरकारचे. यातील केंद्र सरकारच्या सीजीएसटी कार्यालयावर सीबीआयने धाड टाकली. या कारवाईमध्ये सीजीएसटी विभागाचा अधीक्षक चंद्रकांत चवाहणके हाती लागला आहे. या सुप्रिटेंडंटने नक्की किती लाच घेतली, कुठे घेतली, कुणाकडून आणि कशासाठी घेतली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, लाचेचा आकडा मोठा असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकचे बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
नाशिकमध्ये गेल्या दोन तीन दिवसांत एसीबीने धडक कारवाई केली दोन दिवसांत दोन मोठ्या अधिकारी एसीबीच्या जाळयात सापडले आहेत. दोन दिवसांपूर्वी आरोग्य उपसंचालक विभागातील अधिकारी जाळ्यात अडकल्यानंतर काल आदिवासी विकास विभागात बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या दिनेशकुमार बागुल यांनी 28 लाखांची लाच मागितली. याप्रकरणी त्यांना काल दुपारी अटक करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांना 8 लाखांच्या लाचप्रकरणी करण्यात अटक आली होती. तर आज नाशिकमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या सीबीआय पथकाने केंद्र सरकारच्या पाथर्डी फाटा रोडवरील सीजीएसटी विभागातील अधीक्षकास ताब्यात घेतले आहे.