Nashik Hanuman Birth Place : हनुमान जन्मस्थळाच्या (Hanuman Birth Place) वादावर शास्रार्थ सभेत झालेल्या गदारोळानंतर अंजनेरी वासीय (Anjneri) आक्रमक झाले असून गोविदानंद महाराज यांची नाशिकमधून (Nashik) हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. 


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबतचा वाद चांगलाच पेटला आहे. हा वाद सोडविण्यासाठी नाशिकरोड येथे शास्रार्थ सभेत साधू महंतांचा वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाले. सभेला उपस्थित असलेल्या गोविंदानंद महाराज आणि नाशिकच्या साधू महंतांमध्ये वाद झाला. स्थानिक महंत सुधीरदास महाराज यांनी माईक उगारल्याने गोविदानंद महाराज संतप्त झाले. त्यांनी उभे राहत माफी मागण्याची विनंती केली. यानंतर वाद इतका वाढला कि शेवटी पोलिसांना घटनास्थळी दाखल व्हावे लागले. 


साधू महंतांच्या शास्रार्थ सभेनंतर अंजनेरी ग्रामस्थ आक्रमक झाले असून गोविदानंद महाराज यांची नाशिक मधून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. गोविंदानंद महाराज अंजनेरी मधून बाहेर गेले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ज्या पद्धतीने अंजनेरीचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तितक्याच निर्भिडपणे गोविंदनंद महाराज सुद्धा आपल्या दाव्यावर ठाम असल्याने हा वाद चांगलाच रंगला आहे. हनुमानाचे जन्मस्थळ नेमका कुठला आहे? यावर शास्त्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सुरुवातीला मानापमान आणि त्यानंतर थेट एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत साधू महंत गेले होते आणि त्यामुळे शास्रार्थ सभा रद्द करण्यात आली होती. 
पोलीस बंदोबस्त 
नाशिकरोड च्या सिद्धपीठ आश्रमात शास्रार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या शास्रार्थ सभेत साधू महंत एकमेकांशी भिडले होते. एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि त्यामुळे एकूणच वादाची पार्श्वभुमी शास्रार्थ सभेला मिळाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गोविंद सरस्वती पत्रकार परिषद घेऊन शकतात. त्यामुळे सदर सिद्धपीठ आश्रमाच्या आवारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.                                                                                                                                                                            गोविंदानंद महाराज दाव्यावर ठाम 
नाशिकरोडच्या सिद्धपीठ आश्रमामध्ये झालेली शास्त्रार्थ सभा रद्द करण्यात आली असली तरी ज्या लोकांना आपले प्रमाणे सादर करायचे होते त्यांनी सादर करून झालेले आहे. त्यामुळे जगद्गुरुची  माफी मागितल्याशिवाय नाशिक सोडणार नाही, किष्किंदा हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याच्या दाव्यावर आम्ही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.