Nashik News : सन 2022-23 हे वर्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Chatrapati Shahu Maharaj) यांचे स्मृती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. स्मृती वर्षाचे औधित्य साधून समाज कल्याण विभागाने वाचन प्रेरणा उपक्रमातुन अभिनव पध्द्तीने अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे (Dr. Prashant Narnaware) यांनी दिली आहे.


इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वत्तीने राज्यातील विभागाच्या अधिकारी यांच्यासाठी 3 दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन नाशिक (Nashik) येथे करण्यात आले होते. त्यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे ही उपस्थितीत होते, यावेळी त्यांनी वाचन प्रेरणा उपक्रमाची माहिती दिली. विचारांची सुसंस्कृतता ही समृद्ध व दर्जेदार साहित्याचे वाचन केल्याने प्रगल्भ होत असते. वाचनाने मनावर सुसंस्कार होतात, विचारांना चालना मिळते, यामुळे समाजातील प्रत्येक घटकास वाचनासाठी प्रवृत्त करणे ही काळाची गरज आहे. यासाठीच वाचन प्रेरणा उपक्रमाची अंमलबजावणी मा.सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  
राज्यात जुलै 2022 ते नोव्हेबर 2022 या 05 महिन्याच्या कालावधीत सर्व शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृहे, समाजमंदीरे या ठिकाणी वाचन प्रेरणा उपक्रम व वाचन स्पर्धाचे व्यापक आयोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 2388 अनुदानित वसतिगृहे, 441 शासकीय वसतिगृहे, 165 अनु. जातीच्या आश्रम शाळा तसेच 90  शासकीय निवासी शाळा आहेत. त्याच प्रमाणे 67618 इतक्या अनुसुचित जाती लोकवस्त्या आहेत. या सर्व ठिकाणी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.


त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी मुख्याध्यापक हे 'दप्तराविना शाळा" या उपक्रमांतर्गत "वाचू आनंदे" या तासिकेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वाचना साठी प्रेरणा देणार आहेत. तसेच वसतिगृह अधिक्षक हे देखील दर शनिवारी “बाबू आनंदे” या तासिकेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वाचना साठी प्रेरणा देणार आहेत. जुलै 2022 ते नोव्हेबर 2022 या 05 महिन्याच्या कालावधीत प्रत्येक आठवड्यात आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार  शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालक व गावातील मान्यवर व्यक्ती यांची बैठक घेऊन वाचन उपक्रमाची माहिती देतील. तसेच 'एक व्यक्ती-एक पुस्तक भेट ही संकल्पना राबवून समाज सहभागातून पुस्तक पेढी समृध्द करण्यासाठी प्रतत्न करतील. 


असे असतील उपक्रम 
प्रत्येक व्यक्तीने/ शिक्षकांनी /माजी विद्यार्थ्यांनी/ पालकांनी एका शाळेला विद्यार्थ्याच्यानुरूप पुस्तके भेट द्यावीत. वसतिगृहांत विद्यार्थी, पालक, मान्यवर व्यक्ती यांची  बैठक घेऊन उपक्रम राबावावा. सहाय्यक आयुक्तांनी ज्या ठिकाणी समाज मंदिर आहेत त्याठिकाणी ठिकाणी लेखक/कवी/ प्रभावी पणे वाचन करणारी वाक्ती यांचे मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करावे  'पुस्तक आपल्या भेटीला' अंतर्गत परिसरातील चांगल्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांच्या भेटीचे आयोजन करणे. समतादूतांच्या मदतीने स्वताहून इच्छुक असणाऱ्या व्यक्तीची / विद्यार्थ्यांची वाचन प्रेरणादुत म्हणून नेमणुक करावी. वाचन प्रेरणा दुताच्या मदतीने चांगल्या पुस्तकांची माहिती तेथील घटकांना द्यावी. राज्यात प्रथमच अशा अभिनव पध्दतीने वाचन प्रेरणा उपक्रम राबवुन महापुरुषास अभिवादन करण्यात येत असल्याचेही डॉ.प्रशांत नारनवरे यांनी यावेळी सांगितले.