Sharad Pawar in Dhule : एका वेगळ्या रस्त्याने देश चालविला जात आहे. हे थांबविणे आवश्यक असून यासाठी आता तुमची माझी सगळ्याची जबाबदारी आहे, काय पडेल ती किंमत उभी करू, मात्र लोकशाहीचे जतन करू, खान्देशचा राष्ट्रवादीचा (NCP) कार्यकर्ता तळमळीने उभा राहील, सगळ्यांशी सुसंवाद करू अशा शब्दांत शरद पवार (Sharad Pawar) यांनी कार्यकर्त्यांत स्फुर्ती भरली. तर दुसरीकडे राज्यपालांच्या (Governor Koshyari) दोन वर्षातील दुहेरी भूमिकेवर टीकास्त्र सोडले. 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज धुळे (Dhule) येथे राष्ट्रवादी भवनाच्या नूतन वास्तूच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय सद्यपरिस्थितीवर ताशेरे ओढले. लोकांशी संवाद साधावा, कार्यकर्त्यांनी गाठीभेटी घेतल्या पाहिजे. हे पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. मागील दोन आठवड्यात राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी चांगला पाऊस झाला, गडचिरोली, यवतमाळ, नागपूर, अतिवृष्टीन नुकसान केलं आहे, अजित पवार (Ajit Pawar) हे गेल्या तीन दिवसांपासून नुकसान ग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. हाच दृष्टीकोन पक्षाचा असला पाहिजे, संकट आल्यानंतर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधीही मागे जात नसतो, इथल्या पक्षाची वास्तु अडचणीत होती, ती आज उत्तम स्थितीत झाली आहे, त्यामुळे मला आंनद झाल्याचे ते म्हणाले. 


मात्र हे लोकांन आवडलं पाहिजे, लोकांना ही जागा आपली आहे हे वाटलं पाहिजे, युवकांचा महिलांच्या जागा आहे, शहराध्यक्ष साठी आहे, जिल्हाध्यक्ष साठी प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी ही जागा आहे..लोकांना कळलं पाहिजे की राष्ट्रवादी भवन आपलं आहे, आपल्या समस्या सोडवणार लोक इथं आहेत. ज्या दिवशी हे चित्र दिसेल त्या दिवशी लोकांच्या विश्वासाला आपण किती पात्र आहोत हे कळेल, कोणत्याही वेळी मग तुम्हाला अडचण येणार आहे. महानगरपालिकेने इथं जागा दिली त्यांचे आभार, काही अटी घालून जागा दिली या सगळ्याचा वास्तूच्या भविष्यासाठी हातभार लागला आहे


शरद पवार पुढे म्हणाले सत्तेचे काही जोश असतात, सत्तेचे काही नियम असतात. मात्र सध्या याउलट होत आहे. भाजपवर टीका करताना म्हणाले कि, तुमच्याकडे बहुमत आहे, म्हणजे लोकांना हे दिसायला नको, राष्ट्रपतीचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केलेल्या अधीररंजन चौधरींनी माफीही मागितली. मात्र त्यानंतर सोनिया गांधींवर हल्लाबोल करण्यात आला. सोनिया गांधी फक्त विचारण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर सर्वच भाजप नेत्यांनी हल्ला केला. सदनामध्ये भीषण दृश्य बघायला मिळाले. संबंध देशामध्ये महाराष्ट्रात नाच्चकी झाल्याचे पाहायला मिळाले.


विधानसभा अध्यक्ष निवड घेतला गेला, राज्यपालकडे प्रस्ताव पाठविला दोन वर्षे सही केली नाही. सरकार बदललं तेव्हा नवा मुख्यमंत्री आला, दोन दिवसात नवा अध्यक्ष आला राज्यपाला सारखा व्यक्ती एक वर्षात एक दुसरा वर्षात दुसरी भूमिका घेतात घेत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने लोकशाहीवर विशेष ठेवायचा कसा.? एका वेगळ्या रस्त्याने देश चालविला जात आहे. आता तुमची माझी सगळ्याची जबाबदारी आहे, काय पडेल ती किंमत उभी करू मात्र लोकशाहीचे जतन करू, अत्याचार करणाऱ्या प्रवृतती विरुद्ध उभे राहू खान्देशचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तळमळीने उभा राहील, तालुक्यात जाऊन भेटीगाठी घेऊ, सगळ्यांशी सुसंवाद करू अशा शब्दांत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांत स्फुर्ती भरली. 


सत्तेचा दुरुपयोग होतोय!
1960 साली त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असताना त्यांनी सत्तेचा विकेंद्रीकरण केले. पंचायत राज्याची स्थापना केली, जिल्हा परिषद काढली, सत्ता अधिक लोकांच्या हातात गेली. निर्णय घेण्याचा अधिकार गावातल्या शेवटच्या मांणसापर्यत पोहचला. सत्ता चुकीच्या मांणसापर्यत गेली तर लोक धडा शिकवतात, आज सध्या तेच चालू आहे. सत्ता ही विकेंद्रित असते, केंद्रित झालेली सत्ता सामान्य माणसाला यातना देत असते. आमच्या हातात सत्ता आहे, आम्ही बोलू ती पूर्वदिशा, टोकाची भूमिका घेतली जात आहे. सत्तेचा गैरवापर करून एकप्रकारे दमदाटीचे वातावरण तयार करीत असल्याचे दिसत आहे. त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.