Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील जेलरोडचा सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेच्या सक्रिय सभासद रंजना रामचंद्र शिंदे (Ranjana Shinde) यांचे जम्मू-काश्मीरमधील अंबरनाथ यात्रेदरम्यान (Amarnath Yatra) निधन झाले.
जम्मू काश्मीर (jammu Kashmir) येथील अमरनाथ यात्रेसाठी नाशिक शहरातील पंचक गावातील महिलेचा आकस्मिक निधन झालं आहे. रंजना रामचंद्र शिंदे असे या भाविक महिलेचे नाव आहे. या महिलेचा मृतदेह विमानाने नाशिकमध्ये आणला जाणार आहे. रंजना शिंदे आपले पती रामचंद्र शिंदे, भाऊ अजित बोराडे, बहीण बेबीताई खताळे, लताबाई बोराडे यांच्या समवेत 15 जुलै रोजी अमरनाथ यात्रेसाठी गेल्या होत्या. बुधवारी अमरनाथ दर्शन साठी जात असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागले. अमरनाथ डोंगरावर उंचावर असताना त्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवायला लागली होती. याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
रंजना शिंदे यांची यंदा अमरनाथच्या चौथी यात्रा होती. रंजना शिंदे या परिवारासह रेल्वेने अमरनाथ यात्रेला रवाना झाल्या होत्या. बुधवारी त्यांना दर्शनाची तारीख मिळाली होती. सकाळी हे कुटुंब अमरनाथ गुहेकडे रवाना झाले. सकाळी नऊला रंजना यांची प्रकृती खालावल्याने शाईन बोर्ड सामाजिक संस्था व लष्कराच्या डॉक्टरांनी इंजेक्शन गोळ्या दिल्या. नंतर हे कुटुंब पुढे रवाना झाले. अमरनाथ गुहा पाच किलोमीटरवर असताना शिंदे याना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
नामदार डॉ. भारती पवारांची मदत
रंजना शिंदे यांचे अमरनाथ येथे निधन झाल्याचे समजताच त्यांचे शहरातील दशक-पंचक येथील नातेवाईक शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाबुराव आढाव यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यमंत्री भारती पवार यांचे निकटवर्ती पदाधिकारी असलेले सरपंच विलास मतसागर यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने डॉ.पवार यांना ही माहिती दिली. डॉ. पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत विमान उपलब्ध करून देण्यास मदत केली. गुरुवार रात्री उशिरापर्यंत रंजना शिंदे यांचा मृतदेह नाशिकमध्ये आणला गेला. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.
साहित्याची आवड
रंजना शिंदे या मराठी साहित्य परिषदेच्या सदस्य होत्या. नाशिकरोड येथील शाखेच्या त्या प्रमुख होत्या. अनेक कवी संमलेने, लेखकांच्या गाठीभेटी त्या घेत असत. त्यांना साहित्याची ही मोठी गोडी होती. यात्रेहून परतल्यानंतर व्यवसाय सुरू करून जीवनाला नवी दिशा देण्याची त्यांची इच्छा होती.