Chhagan Bhujbal NCP : 2019 ला शिवसेनेसोबत (Shiv Sena) गेलो, मग आता भाजपसोबत गेल्याने काय फरक पडतो. शिवसेनेबरोबर गेलो, तसेच भाजपबरोबर गेलो, यात नवीन काय? आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला नाही. तर सरकारमध्ये सामील झालो. काही दिवसांपूर्वी नागालँड मंत्रिमंडळात भाजपबरोबर राष्ट्रवादी सामील झाली, मग आम्ही काय केलं, आम्ही काय चूक केली? असा सवाल भुजबळांनी (Chhagan Bhujbal) उपस्थित केला आहे. 


आज अजित पवार (Ajit Pawar) गटाची मुंबईतील एमईटी भुजबळ नॉलेज सिटीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत छगन भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिलेच भाषण जोरदार केले आहे. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वादावर त्यांनी सडकून टीका केली. छगन भुजबळ म्हणाले की, अनेकदा सांगूनही पक्षात नियुक्त्या होत नव्हत्या. अजित पवार यांनी देखील अनेकवेळा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी याबाबत संवाद साधला, म्हणाले माझ्याकडे पॅड द्या, मी सर्व जबाबदारी पार पडतो, मात्र असं घडलं नाही, म्हणूनच हे बंड केल्याची स्पष्टोक्ती भुजबळांनी केली. नागालँड सरकारमध्ये भाजपसोबत जशी राष्ट्रवादी सामील झाली, तसेच आम्हीही केलं आहे, त्यांचा जसा सत्कार केला तसाच आमचाही सत्कार करा, असे आवाहनच, भुजबळांनी यावेळी केले. 


तर राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष झाला असता... 


तसेच आम्ही पंधरा दिवस वाट पहिली, मग निर्णय घ्यावे लागले, कार्यकर्ते, आमदारांचा आग्रह होता. हे काम आजच सुरु झालं नाही, काही महिन्यापासून ही प्रक्रिया सुरु होती. वेळ मिळाला असतात तर राष्ट्रवादी (Maharashtra NCP) देशाचा एक नंबरचा पक्ष झाला असता, मात्र तस झाले नाही. सुरुवातीला काँग्रेसला सोबत घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, मी उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे एक महिन्याच्या आत मी राजीनामा दिला, माझं काम पक्षातील इतर नेत्यांवर दिले. मात्र पक्षात फेरबदल होत नव्हते, सगळ्यांच्या निवडणूक घ्या, असे नेहमी सांगत आलो, मात्र निवडणुका होत नव्हत्या. पक्षातील प्रांताध्यक्ष निवडणूक घेतली जात नव्हती, मात्र इतर निवडणुका कशाला घेता? असा सवाल त्यावेळी उपस्थित केल्याचे भुजबळांनी सांगितले. 


आमचाही सत्कार करा.... 


ते पुढे म्हणाले की, 2019 ला शिवसेनेसोबत गेलो, मग आता भाजपसोबत गेल्याने काय फरक पडतो. शिवसेनेबरोबर गेलो, तसेच भाजपबरोबर गेलो, यात नवीन काय? आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला नाही. तर सरकारमध्ये सामील झालो. काही दिवसांपूर्वी नागालँड मंत्रिमंडळात भाजपबरोबर राष्ट्रवादी सामील झाली, मग आम्ही काय केलं, आम्ही काय चूक केली? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. त्या लोकांचा सत्कार केला, मग आता आमचाही सत्कार करा, असे आवाहन भुजबळांनी शरद पवार यांना केले. मात्र यानंतर आता आम्ही सर्वांसाठी काम करणार असून शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. ओबीसी आणि समता परिषदेचे काम करत राहणार असल्याचे भुजबळ म्हणाले. आम्ही सद्यस्थितीत अनेक नियुक्त्या करत आहोत, नव्या जोमाने काम करणार आहोत,  तसेच सगळ्या समाजाला घेऊन पक्ष पुढे घेईन जाण्याचा निर्धार केला आहे. 


भुजबळांकडून अनेक प्रश्न उपस्थित?


1999 साली ज्यावेळी पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्राचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. तर शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहू लागले. हळूहळू पक्ष वाढत गेला. 99 साली काँग्रेसपासून दूर झाल्यानंतर परत आम्ही काँग्रेससोबत गेलो. त्यावेळी शरद पवार काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळात गेले. त्यानंतरच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे झाले. त्यानंतरच्या काळात म्हणजेच 2014 साली वेगवगेळे लढायचं कस ठरलं, त्यावेळी बीजेपीने शिवसेना सोडली, मग राष्ट्रवादीने काँग्रेस का सोडली? नंतर 2019 ला पहाटेचा शपथविधी कसा घडला? का निर्णय घेण्यात आला? त्यावेळी शरद पवार यांनी गुगली टाकल्याचे बोलले गेलं, मात्र या गुगलीत आपलाच गडी आऊट झाला, हे लक्षात आले नाही. याबाबतचे कारण अजित पवार सांगतील, असेही भुजबळ म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra NCP Crisis : आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा नेमका रोख कोणाकडे?