Nashik News : येत्या पंधरा दिवसांच्या आत भगुरला (Bhagur) अधिकृतरित्या पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार असून त्याचबरोबर थीम पार्क आणि म्युझियमसाठी पाच कोटी रुपये देत असल्याची घोषणा मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली. तसेच थीम पार्क देखील पुढच्या वर्षी 28 मे रोजी पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन यावेळी लोढा यांनी दिले. 


नाशिकच्या (Nashik) भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आत्मार्पण दिनानिमित्त पर्यटन विभागाद्वारा आयोजित पदयात्रा आणि अभिवादन कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले कि, आज आनंदाचा क्षण असून सावरकर यांचा वाडा बघून आनंद झाला..एक ऊर्जा मिळाली..भगूरच्या रहिवाश्यांमुळे भगुर एक तीर्थस्थान झाले आहे. तुम्ही आजपर्यंत सावरकर यांची ज्योत जपली. सावरकर स्वातंत्र्यवीर होते, हिंदू संघटक होते. त्यांनी सामाजिक उत्थान करण्यासाठी देखील प्रयत्न केले. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Damodar Savarkar) यांचे विचार भारतातच नव्हे तर जगभरात पोहचविण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने सावरकरांचे जन्मस्थान भगूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय व भव्य थीम पार्कची करण्यात येणार असल्याचे लोढा म्हणाले. 


ते पुढे म्हणाले कि, यात भगूर येथील गेली अनेक वर्ष अपूर्णावस्थेत असलेले थीम पार्क हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून त्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. तसेच पुढील पंधरा दिवसांच्या आत भगुरला अधिकृतरित्या पर्यटन स्थळ म्हणून घोषित करू. तसेच थीम पार्क देखील पुढच्या वर्षी 28 मे रोजी पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन देत थीम पार्क आणि संग्रहालय यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी लोढा यांनी केली. आपण सर्व जण सावरकर यांचे अनुयायी आहोत. सावरकर यांचा वाडा, त्यांची शाळा हे देखील सुधारणा होईल. हे सावरकरांच्या विचारांचे सरकार असून आम्ही सर्व जण त्यांचे मावळे असल्याचे ते म्हणाले. 


मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले कि, सावरकर संस्कार तीर्थ परिक्रमा यात भगुर, त्यानंतर पुणे, सांगली, रत्नागिरी आणि मुंबई अशा स्थळांचा समावेश असेल.. त्यानंतर 15 दिवसांच्या आत भगुर पर्यटन स्थळ घोषित होईल. त्याचबरोबर 10 हजार स्क्वेअर फूटचे म्युझियम मे 2024 मध्ये पूर्ण होईल. पुणे येथील शिवसृष्टीच्या धर्तीवर इथे देखील शिवसृष्टी होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आदेश काढून हा थीम पार्क पर्यटन विभागाच्या हवाली केला आहे. पर्यटन विभाग एक वर्षाच्या आत पूर्ण करेल..सर्व विकासकामे करण्यासाठी मे 2024 ही डेडलाईन आहे. शिवाय सावरकर संस्कार तीर्थ हा रुट देखील जाहीर केला करण्यात आल्याचे ते म्हणाले.