Nashik Girish Mahajan : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्यात अजित पवार (Ajit Pawar) अर्थमंत्री असताना मोठी मदत झाली, असे मोठे वक्तव्य ग्रामविकास गिरीश महान यांनी नाशिकमध्ये केले आहे. यावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले असून चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच निर्णय होईल, असेही गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 


ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. आज व्यापारी गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकरांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले कि, मंत्रीमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले असून चर्चा सुरू आहे, लवकरच निर्णय होईल.. खाते आणि नावानूसार चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांवर भाजप नाराज असे काहीही नाही.. शिवसेनेचा (Shivsena) निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत, भाजपचे भाजपकडे आहे. तर ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याच्या चर्चा आहे. यावर गिरीश महाजन म्हणाले कि, ठाकरे गटाला रोजच धक्के बसत आहेत. त्यांना अनेक झटके बसत आहेत आणि पुढेही बसणार आहेत. सकाळच्या भोंग्याशिवाय कोणीही त्यांच्यासोबत कोणीही नाही. अनेक आमदार खासदारही पुढे त्यांना सोडून जाणार असल्याचे ते म्हणाले. 


तसेच एपीएमसी ऍक्ट (APMC Act) रद्द करण्याची व्यापाऱ्यांची मागणी  होत आहे. यावर महाजन म्हणाले कि, सहकार मंत्र्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. मंत्रीमंडळ विस्तारावर महाजन म्हणाले कि, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले आहेत. चर्चा सुरू आहे, लवकरच निर्णय होईल. खाते आणि नावानूसार चर्चा सुरू आहे. शिवसेना निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत असून भाजपचे भाजपकडे असल्याचे महाजन म्हणाले.  जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे झाली नसल्याचा आरोप होत आहे. यावर महाजन म्हणाले कि, गैरकारभार सुरू असेल तर तशी तक्रार करावी, नुसते भ्रष्टाचार आरोप करून फायदा नाही. 


उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी..... 


तर आज वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच औरंगजेब यांच्या कबरीवर भेट दिली. यावर महाजन म्हणाले कि, कोणीही याचे समर्थन करणार नाही, मतांचे लांगल चालण चालले आहे. उद्धव ठाकरेंचे याला समर्थन आहे का? प्रकाश आंबेडकर आधी काँग्रेसच्या त्यानंतर शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका आता आंबेडकरांबाबत स्पष्ट करावी. त्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरून बियांणांबाबतचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनीही आरोप केले आहेत. यावर महाजन यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले कि, काही पुरावे असतील तर द्या, तक्रार करा, भाजप शासित प्रदेशातून येतात, असं फक्त म्हणण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन निधी वाटपात गैरप्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर महाजन म्हणाले कि, निधी वाटप कमी जास्त असे होत नाही नियमानुसार होते.. काँग्रेस राष्ट्रवादी आमदार नाराज असू शकतात. 


शिवसेनेच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा... 


तर उद्याच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देताना महाजन म्हणाले कि, उद्धव ठाकरेंची केविलवाणी अवस्था झाली आहेत. आमदार खासदार त्यांना सोडून जात आहेत. याच त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा मिळत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात नवा पक्ष बीज पेरू पाहत आहेत. यावर ते म्हणाले कि, बीआरएसला महाराष्ट्रात काहीही यश मिळणार नाही, ईथे राजकारणी आणि मतदार मुरलेले आहेत. त्यांना राज्यात आणण्यात भाजपचा कुठलाही हात नसल्याचे तयांनी स्पष्ट केले आहे.