11th Admission : आज अकरावी प्रवेशाची (Maharashtra FYJC Merit List ) पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या पहिल्या गुणवत्ता यादीत 12623 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा नाशिकमधील (Nashik) नामांकित कॉलेजचा कट ऑफमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेताना चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत (Merit List) 9123 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. तर 1553 विद्यार्थ्यांना दुसरा पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. 814 विद्यार्थ्यांना तिसरा पसंतीचे कॉलेज मिळाले आहे
नाशिक विभागातून अकरावी प्रवेशाची आकडेवारी पाहिली तर विज्ञान (Science) शाखेत प्रवेश घेणाऱ्या 6177 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळाले आहे. वाणिज्य (Commerce) शाखेत प्रवेश घेणाऱ्या 4218 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळाले आहे. कला (Arts) शाखेत प्रवेश घेणाऱ्या 2081 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळाले आहे. तर एचएसव्हीसी शाखेच्या 147 वाटप करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यावर्षीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून दहावी उत्तीर्णांच्या गुणवत्तेवर कोरोनाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत नाशिक मनपा हद्दीत पहिल्या गुणवत्ता यादीत यंदा सर्वाधिक विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीची शाखा आणि काॅलेज मिळाले आहेत. यावर्षी विज्ञान शाखेसाठी एक टक्का तर कला शाखेसाठी दोन टक्के कट ऑफ वाढल्याचे दिसून आहे. पहिल्या फेरीत जागावाटपाच्या यादीत प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन 06 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावे लागणार आहेत.
नाशिक शहरातील महत्वाच्या महाविद्यालयांचा कट ऑफ
- एचपीटी आरवाय के महाविद्यालय : आर्ट 404, सायन्स 423
- एमएस गोसावी जुनिअर कॉलेज : कॉम 391, सायन्स 388
- बॉईज टाऊन जुनिअर कॉलेज : कॉम 390, सायन्स 401
- केटीएचएम कॉलेज : आर्ट 373, कॉम 350, सायन्स 387
- व्ही एन नाईक कॉलेज : आर्ट 355, कॉम 343, सायन्स 404
- पंचवटी कॉलेज : आर्ट 354, कॉम 361, सायन्स 320
- आर्ट कॉमर्स कॉलेज नाशिकरोड : आर्ट 302, कॉम 360, सायन्स 356
- केएसकेडब्ल्यू कॉलेज सिडको : आर्ट 327, कॉम ३४५, सायन्स ३५४
प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर....
पहिल्या फेरीत जागावाटपाच्या यादीत प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन 06 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावे लागणार आहेत. जर मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर ते पुढील फेरीची वाट पाहू शकणार आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय मिळालेले आहे. त्यांनी तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार आहे.त्यामुळे कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेशासाठी धडपड करावी लागणार आहे. मात्र बहूतांश विद्यार्थ्यांचा कल हा प्रथम पसंतीचे महाविद्यालय निवडण्याकडे असल्याने पहिल्या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे, हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.