नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये पक्षांची अदलाबदली सुरु असल्याचे चित्र आहे. आता नाशिकमध्ये भाजपमधून गळतीला सुरुवात झाल्याची दिसून येत आहे.

  


राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरून चर्चा सुरु आहेत. मात्र ज्या उमेदवारांना तिकीट मिळणार नाही अशी उमेदवारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून तिकिटासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. 


गणेश गीते शरद पवार गटाच्या वाटेवर


त्यातच आता नाशिकमध्ये भाजपमधून गळतीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. माजी स्थायी समिती सभापती आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते (Ganesh Gite) हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत आज गणेश गीते जयंत पाटील (Jayant Patil) आणि शरद पवारांची (Sharad Pawar) घेणार भेट आहेत. नाशिक पूर्व मतदारसंघातून गणेश गीते हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले (Rahul Dhikle) हे भाजपचे  विद्यमान आमदार आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळत नसल्याने गणेश गीते हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Group) वाटेवर आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


भाजपची पहिली यादी आज होणार?


दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शुक्रवारी पहिली उमेदवारी यादी (BJP Candidate list) जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या यादीत 100 उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत भाजपच्या 100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीतील 100 उमेदवारांची नावे निश्चित करताना गेल्या पाच वर्षांमधील त्यांची कामगिरी हा प्रमुख निकष होता. अनेक विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर पक्ष नाराज आहे. त्यांच्याऐवजी संबंधित मतदारसंघात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या यादीतून नेमकी कोणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या