नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. आचारसंहिता लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नाशिकच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात (Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency) पहिली सभा पार पडली. हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) हे इगतपुरीचे मतदारसंघाचे आमदार आहे. नुकताच त्यांनी काँग्रेसला (NCP) रामराम करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. हिरामण खोसकर यांच्यावर काँग्रेसकडून क्रॉस व्होटिंगचा आरोप करण्यात आला होता यावरून अजित पवार यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केलाय. तर हसन मुश्रीफ, राजेश पाटील यांच्यानंतर हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा अजित पवार यांनी केली आहे. 


अजित पवार म्हणाले की, हिरामण खोसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी देवगिरी बंगल्यावर प्रवेश केला. इतरांचा आता होणार आहे. आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी चालतो. एकमेकांच्या बाबतीत आम्ही सन्मान ठेवतो. जाती-पाती आम्ही मनात नाही. कधी काही वाचाळवीर काही तरी बोलतात ते आपल्या महाराष्ट्रला न पटनारे असते. आपण त्याचा त्याच वेळी निषेध करतो. ज्यांनी प्रवेश केला त्यांना आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो, असे होऊ देणार नाही. 


हिरामण खोसकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न 


आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडलो, दोन भावंडं वेगळी झाले तसे ते झाले. तो 1999 चा काळ होता. अलीकडच्या काँग्रेसने हिरामण खोसकर यांना अनेकवेळा बदनाम करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस मला जिथे मत द्यायला सांगेन, तिथे मत देणार असे खोसकर बोलले होते. आम्ही त्यांना काही सांगितले नाही. हिरामण खोसकर यांचा स्वभाव सर्वांना मिसळून राहणारा आहे. विकासाच्या कामासाठी ते आमच्याकडे येत होते. आम्ही 54 आमदार निवडून आलो होतो, पण त्यात 55 वे नाव हिरामण खोसकर यांचे होते, असे अजित पवारांनी म्हटले आहे.


नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याबाबत अजित पवारांचे आश्वासन


ते पुढे म्हणाले की, मी कधीच दुजाभाव केला नाही. आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत. मूठभर लोकांचे नाही. हिरामण खोसकर आणि नरहरी झिरवाळ हे दोघे जुळे भाऊ असल्याचे शहरी भागातील लोकांना वाटते. आता परतीचा पाऊस पडतोय. त्यातून भाताचे नुकसान होतं आहे. बऱ्याच पिकांच्या नुकसान होतंय. तुम्ही त्या ठिकाणी पंचनामे करायला सांगा, जरी आचारसंहिता असली तरी नैसर्गिक संकट आहे. आता वरिष्ठांना सांगितले जाईल, याबाबत पंचनामे होतील, असे अजित पवारांनी दिले. 


महायुतीच्या उमेदवाराचे बटन दाबा


लोकसभा निवडणुकीत आम्ही किंमत मोजली. कांदा प्रश्नावर आम्ही मोदी, अमित शाह यांना भेटलो. निर्यातबंदी उठवा, आता कांद्याला भाव आला आहे, असे त्यांनी सांगितले. 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. महायुती, महाविकास आघडी, मनसे, हौशे नवशे गवसे सर्व उभे राहतील, पण तुम्ही महायुतीच्या  उमेदवाराचे बटन दाबा, असे आवाहन अजित पवारांनी उपस्थितांना केले. 


आता का पोटात दुखतंय?


लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वांना मिळत आहेत. माय माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद आहे. ही योजना बंद होणार नाही. सावत्र भावाचे बटन दाबू नका, आम्ही सख्खे भाऊ आहे. योजनेचे पैसे बंद होणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला. तुमचं सरकार असताना तुम्ही कधी केले नाही, आता का पोटात दुखतंय? योजना बंद करायला तुमच्या घरची आहे का? असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. 


महायुतीला म्हणजेच हिरामण खोसकर यांना निवडून द्या


आम्ही कुंभमेळ्याच्या कामात लक्ष घालू. आता निवडणुकीचा काळ आहे. काम करून घेण्याची धमक असावी लागते, प्रशासनावर पकड असावी लागते. अनेक लोक आमच्याकडे येतात. काहींनी आता काढले की, योजना बंद केली, योजना बंद केलेली नाही. आम्ही केंद्रातून निधी आणू. आम्ही शेतकऱ्यांना आणि कोणालाच वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधक सत्तेत आले तर योजना बंद पाडतील. राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. विरोधकांनी महाराष्ट्राची बदनामी थांबावावी. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे विरोधक म्हणतात. पण मी अर्थमंत्री आहे, मला माहिती आहे. सत्तेत येण्यासाठी राज्याची बदनामी करू नका, अशी टीका यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर केली. तर महायुतीला म्हणजेच हिरामण खोसकर यांना निवडून द्या, असे म्हणत अजित पवारांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून  हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा केली.  


आणखी वाचा 


Mahayuti Meet With Amit Shah : अमित शाहांचं अजित पवारांना आश्वासन, दिल्लीतील बैठकीत नेमकं काय ठरलं? इनसाईड स्टोरी 'माझा'वर!