Nashik Neo Metro : नाशिककरांचं (Nashik) निओ मेट्रोचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सुतोवाच केल्यानंतर अवघ्या चारच दिवसात नाशिक महापालिका आणि राज्य सरकारने केंद्र सरकारकडं याबाबतच सादरीकरण केलं आहे. त्यामुळं आता लवकरच या मेट्रो प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला जाणार असल्याची शक्यता आहे. 


साधारणत: पाच वर्षांपूर्वी महा मेट्रोने नाशिक (Nashik) शहरासाठी टायरवर आधारित ‘मेट्रो निओ’ची (Metro Neo) अनोखी संकल्पना मांडली होती. केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळूनही हा प्रकल्प पुढे सरकला नाही. त्याच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतवाच केल्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये नाशिक महानगरपालिका आणि केंद्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे न्यू मेट्रो संदर्भातील सादरीकरण केले आहे. आता लवकरच या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. नाशिक शहरातील दोन प्रमुख मार्गांवर एकूण 32 किलोमीटर ही न्यू मेट्रो धावणार आहे. 


देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी नाशिक दत्तक घेत 2020 च्या आधीच नाशिकमध्ये निओ मेटो धावणार अशी घोषणा केली होती. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी हे सुतोवाच केले होते. तर 2020 च्या अर्थसंकल्पात काही प्रमाणात तरतूद देखील करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता, त्याला गती मिळाली नव्हती. दरम्यान पुन्हा एकदा 2024 च्या निवडणुकांची चाहूल लागली असून  नाशिककरांना पुन्हा एकदा निओ मेट्रोचे स्वप्न दाखवण्यात आले आहे. तसेच यासाठी विलंब का लागला? याचं कारणही देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या भाजप कार्यकारिणीत स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवल्यानुसार मेक इन इंडिया अंतर्गत देशभरात एकच मॉडेल असावं असं सांगण्यात आलं होतं. कारण अनेक शहरांमध्ये निओ मेटोचा प्रकल्प राबवण्याचे धोरण आहे. 


दरम्यान सार्वजनिक जलद वाहतुकीची गरज लक्षात घेऊन शहरातील संकल्पित मेट्रो निओच्या प्रस्तावाचे महानगर पालिका आणि राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधान कार्यालयात सादरीकरण करण्यात आले. देशातील अन्य शहरांनी यापूर्वीच केंद्राकडे नॅनो मेट्रोचे प्रस्ताव सादर केले आहेत. या सर्वांचा विचार करून देशांतर्गत साधन सामग्रीच्या आधारे संपूर्ण देशात एकाच स्वरुपात नॅनो मेट्रो ठेवण्याचा केंद्राचा मनोदय आहे. तर नाशिक शहरातील २ प्रमुख मार्गावर एकूण 32 किलोमीटरवर ही मेट्रो धावणार असून 29 स्थानक असणार आहे. परंतु ही मेट्रो नेमकी कशी असणार आहे टायर बेस असेल की अन्य काही आता शिगेला पोहोचलेली आहे. महानगरपालिकेने तर आपलं सादरीकरण केला आहे. मात्र केंद्र सरकार नेमकं आता काय सूचना देते? यावर पुढचा संपूर्ण प्रकल्प अवलंबून असणार आहे.