CM Eknath Shinde : मुंबई-नाशिक नॅशनल हायवेवर (Nashik-Mumbai Highway) टोल होता, त्यावेळेस चांगला रस्ता होता. मात्र आता टोल काढून टाकल्याने तो खराब झाला, तो नॅशनल हायवेचा असला तरी सुद्धा राज्य सरकार नाशिकच्या (Nashik) रहदारीसाठी नाशिककरांसाठी पुढील काळात आराखडा तयार करत असल्याचे ते म्हणाले. नाशिककरांना मुंबई प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य सरकार विचार करतंय असा निर्वाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माझा कट्ट्यावर दिला आहे. 


मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज एबीपी माझा कट्ट्यावर (ABP Majha Katta) बोलत होते. यावेळी राज्यभरातील रस्त्यांबाबत बोलताना त्यांनी नाशिक- महामार्गा संदर्भात महत्वाचे विधान केले. नाशिक- मुंबई महामार्ग हा जिव्हाळ्याचा विषय असून या महामार्गासाठी पुढील काही दिवसांत याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. नाशिक-मुंबई महामार्ग हा महत्वाचा राज्यमार्ग असून याबाबत लवकरच सकारात्मक भूमिका घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रश्नांवर उत्तर देतांना दिली.  


दरम्यान माझा कट्ट्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना प्रश्न विचारण्यात आला कि,  मुंबई नाशिक हायवे आहे, मात्र त्याची परिस्थिती पाहता मुंबई पुणे एक्सप्रेस वे जेवढा जगतोय, मुंबई नाशिक हायवेच्या शेवटच्या घटकात मोजतो आहे, इतकी वाईट परिस्थिती झाली आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, त्याच्याबद्दल आम्ही विचार करतोय, कारण तो नॅशनल हायवे आहे. मुंबई नाशिक नॅशनल हायवेवर टोल होता, त्यावेळेस चांगला रस्ता होता. मात्र आता टोल काढून टाकल्याने तो खराब झाला, तो नॅशनल हायवेचा असला तरी सुद्धा राज्य सरकार नाशिकच्या रहदारीसाठी नाशिककरांसाठी पुढील काळात आराखडा तयार करत असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकार नाशिककरांसाठी महत्वाचा निर्णय घेत असून हा निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल. 



नाशिकच्या कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना
राज्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्या रविवारी उदघाटन होत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जात आहे. त्यामुळे नाशिककरांचा मुंबई-नागपूर प्रवासही सुखकर होऊ शकणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून हा महामार्ग जातो आहे. शिवाय पुणे – मुंबई – नाशिक अशा गोल्डन ट्रँगलच्या पलिकडे महाराष्ट्राच्या विकासाला नेणारी एक समृद्ध वाट समृद्धीमहामार्गाच्या रूपाने खुली होणार आहे. त्याचबरोबर नाशिक हे कृषी बरोबरच उद्योगाचेही महत्त्वाचे केंद्र आहे. समृद्धी महामार्गामुळे नाशिक जिल्ह्यातील कृषी आणि औद्योगिक विकासाला अधिक चालना मिळणार असून आहे. 


समृद्धी हायवे हा वर्ल्ड क्लास रस्ता... 
पुढचा एक प्रश्न असा होता कि, अनेकजण कर्नाटकच्या रस्त्यांबद्दल बोलतात, दिल्लीच्या रस्त्याबद्दल बोलतात, पण आपल्या राज्याच्या रस्त्यांची चर्चा कधी होणार आहे? यावर ते म्हणाले, समृद्धी हायवे हा वर्ल्ड क्लास रस्ता आहे. लोक जर्मनीच्या ऑटोबॅनचे उदाहरण देतात. त्याच्यापेक्षा समृद्धी हायवे हा क्वालिटी रोड आहे.  समृद्धी हायवेववर दीडशेचा लिमिट डिझाईन आहे, पण नोटिफिकेशन वन ट्वेंटीचा असून सुपरफास्ट रोड आहे, याची चर्चा होईल, लोक बघायला येतील असेही ते समृद्धी हायवेचे कौतुक करताना म्हणाले. एबीपी माझा कट्ट्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की,  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि मी एमएसआरडीसी मंत्री असताना या प्रकल्पावर काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी मुंबई-नागपूर हा 15 तासांचा प्रवास काही तासांवर आणण्यासाठी काम सुरू करण्यात आले. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.