Nashik Leopard : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात बिबट्याचा (Leopard) वावर सातत्याने दिसून येत आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील सोनगीर येथे नऊ वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. बापलेकीने आरडाओरड केल्याने सुदैवाने मुलीच्या पायावर संकट निभावले गेले.


नाशिक शहर हे बिबट्याचे माहेरघर बनले आहे. निफाड, सिन्नर (Sinnar), नाशिक शहर परिसरातील काही भाग बिबट्याचा अधिवास नित्याचाच आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील गौरी राजेंद्र लहाने ही तिच्या वडिलांसोबत सायंकाळी सातच्या सुमारास सोनगिरी येथून नायगावला दुचाकीने जात होते. यावेळी पाटाजवळ दबा धरून बसलेल्या त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये गौरीचा उजवा पाय बिबट्याच्या जबड्यात आल्याने ती जखमी झाली आहे. दोघांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली सोनगिरी व नायगाव परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी पिंजराला लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. 


तर शनिवारी नाशिक तालुक्यातील मनोली परिसरात इंदुबाई मुरलीधर गभाले या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. इंदुबाई या आढाव यांच्या मालकी क्षेत्रात द्राक्ष व टमाटे शेतात बकऱ्या चारत असताना अचानक दुपारी तीन वाजता सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात इंदुबाई यांच्या मानेला जखम झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सायंकाळनंतर शेत मळ्यातून प्रवास करणे किंवा रहदारी करणे टाळावे असे आवाहन विभागाने केले आहे. पूर्व भागातल्या सोनगिरी भागात पुन्हा बिबट्याचे दर्शन दिल्याने शेतकरी वर्गात दर्शन निर्माण झाले आहे. या भागात पिंजऱ्या बसवण्याची मागणी शेतकऱ्यांनी विभागाकडे केली आहे.


देवळाली कॅम्प परिसरातील लष्करी भागात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जर बंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. देवळाली कॅम्प परिसर  बिबट्याचे माहेरघर बनले असून दारणा काठच्या गावांमध्ये बिबट्याचे अस्तित्व वारंवार सिद्ध झाले आहे. नाशिक शहरातील उपनगर परिसर असलेल्या देवळाली कॅम्प भागात पश्चिम बाजूला मोठे जंगल भाग आहे. त्या लगतचा लष्करी भाग असून त्याच्या जवळपास असलेल्या आर्मी पब्लिक स्कूलच्या मागील बाजू पाच वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेल्या बिबट्या नाशिक गंगापूर येथील रोपवाटिकेत ठेवण्यात आले असून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. 


दोन दिवसांत दोन हल्ले, एक जेरबंद 
दरम्यान मागील आठवड्यातील शनिवार आणि रविवार जिल्ह्यात बिबट हल्ल्याच्या दोन घटना घडल्या असून एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. नाशिक सिन्नर तालुक्यातील पहिली घटना असून घराकडे जाणाऱ्या बाप लेकीवर बिबटयाने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नाशिक तालुक्यातील मनोली परिसरात बकऱ्या चारत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला चढविला. तर देवळाली भागात बबत्याला जेरबंद झाला आहे.