Nashik Police Bharti : पोलिस भरतीची (Police Bharti) तयारी आता अंतिम झाली असून, 2 जानेवारीपासून मैदानी चाचणीला (Ground Test) सुरवात होणार आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून (Nashik police) याबाबत अधिसूचना काढण्यात आली असून मैदानी चाचणीला येताना उमेदवारांनी कोणती कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, याबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिस दलाअंतर्गत चालकांची 15 तर पोलिस शिपायांची 164 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे एकूण 21 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सुरवातीचे दोन दिवस चालकांसाठी मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. ग्रामीण पोलिसांनी मैदानी परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून ग्रामीण पोलिसांकडे 15 चालक पदांसाठी 2 हजार 114 एकूण उमेदवारांनी अर्ज केले असून यामध्ये 2043 पुरूष उमेदवार तर 71 महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर 164 पोलिस शिपाई पदांसाठी एकूण 21 हजार 49 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये 13 हजार 859 पुरुष उमेदवार तर 5073 महिला उमेदवारांसह 03 तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 


दरम्यान पोलीस भरतीसाठी नाशिक ग्रामीण पोलिस दलाने उमेदवारांना मैदानीसाठी बोलावले आहे. सुरवातीला चालक पदांची मैदानी चाचणी होणार आहे. यावेळी एकूण 1 हजार उमेदवारांना पहिल्या दिवशी मैदानासाठी बोलावण्यात आले आहे. त्यावेळी उमेदवारांकडे शैक्षणिक कागदपत्रे, आरक्षण, क्रिडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, अजाची छायांकित प्रत, प्रवेश पत्र अशी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.


पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक यांची रिक्त पदे भरली जात आहेत. पोलीस भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी 2 जानेवारीपासून राबवण्यात येत आहे. नाशिकच्या पोलीस मुख्यालय आडगाव येथे सकाळी सहा वाजेपासून मैदानी चाचणी सुरुवात होत आहे. ज्या उमेदवारांनी नाशिक ग्रामीण येथे भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन निवेदन अर्ज भरलेले आहेत. त्यांना महाआयटीकडून त्या त्या तारखेचे प्रवेश पत्र पाठवण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित उमेदवारांना ओळखपत्राच्या दोन प्रती आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती, सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींचा संच तसेच आवेदन अर्जावर सादर केलेला पासपोर्ट साईजच्या सहा फोटो आवश्यक असणार आहेत. प्रवेश पत्रावर दिलेल्या तारखेच्या तारखेला सकाळी सहा वाजता पोलीस मुख्यालय, आडगाव, भुजबळ नॉलेज सिटी जवळ उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाकडून करण्यात आले आहे.


हि कागदपत्रे सोबत आवश्यक 
उमेदवारांना ओळखपत्राच्या दोन प्रती 
आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती, 
सर्व मूळ कागदपत्रे 
सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच 
अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो)  
आरक्षण, क्रिडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र