पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (Maharashtra HSC Results 2023 Declared) इयत्ता बारावीचा निकाल (12th Results) जाहीर झाला आहे. पत्रकार परिषदेत बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दुपारी एक वाजेपासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. नाशिक विभागाचा निकाल यंदा 94.71 टक्के लागला आहे. 


राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांच्या वतीनं नोंदणी करण्यात आलेली होती. बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल बोर्डाने नुकताच जाहीर केला आहे. 


नाशिक विभागाचा निकाल 94.71 टक्के 


नाशिक विभागात एकूण 1,58, 173 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,57,345 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 1,49,029 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागातून उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागाचा यंदाचा निकाल 94.71 टक्के लागले आहे. 


नाशिक विभागात मुलींची बाजी


नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल 98.74 टक्के लागला आहे वाणिज्य शाखेचा निकाल 95.21 टक्के, आयटीआय 94.01 टक्के , तर कला शाखेचा निकाल 88.13 टक्के लागला आहे आणि व्यवसाय अभ्यासक्रम 88.62 टक्के निकाल लागला आहे. यात सगळ्यात जास्त विज्ञान शाखेचा निकाल लागला आहे. त्यात 96.32 टक्के मुली आणि 93.39 टक्के मुलांचा समावेश आहे, असा एकूण 94.71 टक्के नाशिक विभागाचा निकाल लागला आहे.


कुठे पाहता येणार निकाल?              



कसा पाहाल निकाल? 



  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

  • निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.

  • संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचं होमपेज ओपन होईल. तेथे महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा.

  • या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला रोल नंबर किंवा शाळेचा कोड विचारला जाऊ शकतो. विचारण्यात आलेली माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.


विभागनिहाय निकाल



यंदाही मुलींची बाजी


यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.


आणखी वाचा 


Maharashtra HSC Result 2024 LIVE Updates: राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI