Maharashtra HSC Result 2024 LIVE Updates: राज्यातील बारावीचा निकाल जाहीर होणार; बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?, जाणून घ्या

Maharashtra HSC Result 2024 LIVE Updates: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahresult.nic.in निकाल पाहता येणार आहे.

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 21 May 2024 01:11 PM

पार्श्वभूमी

Maharashtra HSC Result 2024 LIVE Updates: पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज (21 मे 2024) जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) उच्च...More

निकाल जाहीर होताच वेबसाईट बंद

पुणे: बारावी परीक्षेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाला आहे. मात्र बोर्डाने दिलेली mahresult.nic.in ही वेबसाईट पहिल्या मिनिटापासून डाऊन झाली. विद्यार्थी आणि पालकांनी बारावीचा निकाल पाहण्यासाठी या वेबसाईटवर अक्षरश: उड्या घेतल्या. मात्र ही वेबसाईटच ओपन होत नसल्याचं पाहायला मिळालं. यानंतर पाच मिनिटांनी ही वेबसाईट पुन्हा सुरु झाली.