Nashik Loksabha Constituency : महायुतीत (Mahayuti Seat Sharing) नाशिक लोकसभा मतदारसंघाचा गुंता अद्याप सुटलेला नाही. खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) उमेदवारी त्यांनाच मिळावी या मागणीसाठी आज पुन्हा मुंबईत दाखल झाले. गोडसेंपाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील मुंबई गाठली असून नाशिकचे पालकमंत्री दादा भूसेदेखील (Dada Bhuse) मुंबईला रवाना झाले. नाशिकच्या जागेचा तिढा नेमका कधी सुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


राज्यातील सहा जागांवरून राज्यातील महायुतीचे जागावाटप रखडले आहे. त्यात नाशिकचाही समावेश असून, नाशिकच्या जागेचा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे. नाशिकच्या जागेचा कौल हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्यापैकी एकाला मिळणार, की अन्य तिसराच पर्याय समोर येणार याबाबत आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 


भाजपकडून उमेदवारांची चाचपणी 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ठाण्यानंतर नाशिकची जागा हवी आहे. भुजबळांच्या नावाला स्थानिक पातळीवर विरोध होत आहे. भुजबळ कुटुंबाला हेमंत गोडसेंनी याआधी दोन वेळा पराभूत केले आहे. जर भुजबळांना उमेदवारी दिली तर काय परिणाम होईल, याची चाचपणी भाजपकडून केली जात आहे. जातीय समीकरणे आणि भुजबळांच्या नावाला होणारा विरोध पाहता उद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. 


भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले अभिप्राय


दरम्यान, रविवारी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी करण्यात आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा अभिप्राय देखील घेण्यात आला आहे. हे अभिप्राय भाजपच्या वरिष्ठांना पाठवण्यात आले आहे. या अभिप्रायानंतर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये नाशिकच्या जागेबाबत बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. 


गोडसे, भुजबळ की तिसऱ्यालाच लॉटरी?


त्यामुळे आज नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवर पुन्हा एकदा हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार की छगन भुजबळांना जागा सोडण्यात येईल किंवा कुणी तिसऱ्याचाच यात फायदा होणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Mahayuti Seat Sharing : नाशिक, संभाजीनगरची जागा आमचीच, सर्वांनी युती धर्म पाळावा; संजय शिरसाट थेटच बोलले


मोठी बातमी : महायुतीत राजकीय भूकंप, हेमंत गोडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत