Chhagan Bhujbal Vs Hemant Godse : राज्याच्या राजकाणातील महत्वाची बातमी समोर येत असून, महायुतीमधील नाशिकच्या (Nashik) जागेवरून आता मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाव निश्चित समजले जात असतांना शिंदे गटाचे इच्छुक हेमंत गोडसे (Hemant Godse) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.  हेंमत गोडसें आणि शिवसेना पदाधिकारी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेणार आहे. त्यानंतर ही नाशिकची जागा शिवसेनेला सुटली नाही तर गोडसें अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध गोडसें यांच्यात चौथ्यांदा लढत होण्याची शक्यता आहे. 


नाशिक लोकसभा मतदारसंघातुन हेंमत गोडसें यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना अचानक छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्यानं हेंमत गॉडसे आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या शिवसेनेच्या हेंमत गोडसें यांच्या उमेदवारी बाबत अनिश्चितता असल्यानं गोडसें अपक्ष लढण्याची शक्यता आहे.  भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोडसें भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती 'एबीपी माझा'ला विश्वनिय सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या आधी तीन वेळा गोडसें आणि भुजबळ यांच्या सामना झालेला आहे. 


2009 च्या निवडणुकीत समीर भुजबळ यांच्याकडून 22 हजारांच्या फरकाने पराभव झालेल्या गोडसेंनी  पुढील दोन निवडणुकीत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ दोघांना ही धोबीपछाड देत भगवा फडकवला होता.


हेमंत गोडसें यांची राजकिय कारकीर्द



  • 2007 मध्ये मनसेकडून जिल्हा परिषद सदस्य

  • 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून राज्यात सर्वाधिक मत मिळालेला उमेदवार

  • 2014 च्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा 1 लाख 87 हजार मतांनी केला दारुण पराभव

  • 2019 च्या निवडणुकीत समीर भुजबळ यांचा 2 लाख 92 हजार मतांनी पराभव करत पराभवाची धूळ चारली

  • तीनही लोकसभा निवडणुकीत हेंमत गोडसें यांचे मताधिक्य वाढत गेले होते. याचाच अहवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे. 


हेमंत गोडसे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला...


महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. उमेदवारी मिळावी यासाठी आज पुन्हा एकदा शिवसेना खासदार हेंमत गोडसे मुबंईकडे रवाना झाले आहेत. गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. आज रात्री उशिरा भेट होण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने गोडसें पुन्हा मुख्यमंत्रीच्या दारी जाणार असल्याने नाशिकची जागा तिढा सुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Loksabha : आता पूर्ण ताकदीने लढायचं! नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य