नाशिक : नाशिकचे (Nashik News) शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला आता महायुतीमधूनच विरोध सुरू झाला असून भाजपने सुद्धा या जागेवर दावा केला आहे. भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आज (14 मार्च) नाशिक दौऱ्यावर पोहोचले आहेत. नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या जागेवरून शांतिगिरी महाराज सुद्धा इच्छुक असल्याने नाशिकचा कौल कुणाला मिळाला याची चर्चा रंगली आहे. एकंदरीतच गिरीश महाजन यांनी हेमंत गोडसे यांचे टेन्शन तरी वाढवलं नाही का? अशी चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर हा दौरा होत असल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत.


श्रीकांत शिंदेंकडून उमेदवारीची घोषणा


नाशिक लोकसभेची जागा शिंदे गटाकडेच राहील की भाजपकडे जाईल? याबाबत मात्र अजूनही साशंकता कायम आहे. नाशिक लोकसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असून उमेदवारी कोणाच्या पारड्यात पडणार यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे आणि हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करताना गोडसे यांना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचे असल्याचे म्हटले होते. त्यांनी याठिकाणी दुसरं कोणाचे नाव नसल्याचे म्हणाले होते त्यामुळे महायुतीचे 45 खासदार निवडून आणताना गोडसे यांचे सुद्धा नाव यामध्ये असेल, असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं. दरम्यान नाशिकच्या लोकसभेमधून शांतिगिरी महाराज सुद्धा निवडून निवडणूक लढवण्यास चर्चा आहे.


शांतीगिरी महाराज काय भूमिका घेणार?


दुसरीकडे, नाशिकमधून शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दुसरीकडे, श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्याने आता भाजप आणि राष्ट्रवादी यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. स्वामी शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकरांसोबत (Milind Narvekar) महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) नावाची केल्याने शांतिगिरी महाराज नाराज आहेत. त्यामुळे आता शांतिगिरी महाराजांनी महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरण्याच्या निर्णय घेतला आहे. 


श्रीकांत शिंदेच्या यांच्या मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या उमेदवारीच्या घोषणेने एकच जल्लोष झाला. टाळ्यांचा कडकडाट करत श्रीकांत शिंदेच्या घोषणेचे स्वागत केले. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनीही विकासकामांच्या जोरावर उमेदवारी मिळाल्याचा दावा केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या