Godavari River, नाशिक : गोदावरी नदीत बुडणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीला मनपा अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून वाचवले आहे. रवींद्र ठाकरे हा 50 वर्षीय व्यक्ती पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीत पडला. त्यानंतर वाहत जात होता. मात्र, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लाऊन वाचवलं आहे. 


अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश 


रवींद्र ठाकरे या  50 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे. ही व्यक्ती गोदावरी नदीत वाहत जात असताना कर्मचाऱ्यांनी गोदावरी नदीत उडी घेत पोहत जात सदर व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढले.


पाण्याचा अंदाज न आल्याने ही व्यक्ती पाण्यात पडल्याची माहिती 


गोदावरी नदीत वाहत जात असल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वाचवत वेळीच उपचारासाठी दाखल जिल्हा रुग्णालयात केले. पाण्याचा अंदाज न आल्याने ही व्यक्ती पाण्यात पडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. काल गोदावरी नदी परिसरात  गोदा महाआरती आयोजित करण्यात आली होती. याच कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली.


नाशिक 


- गोदावरी नदीत बुडणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीला मनपा अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले
- रवींद्र ठाकरे या  50 वर्षीय व्यक्तीचे वाचवले प्राण
- ही व्यक्ती गोदावरी नदीत वाहत जात असताना कर्मचाऱ्यांनी गोदावरी नदीत उडी घेत पोहत सदर व्यक्तीला काढले पाण्यातून बाहेर
- गोदावरी नदीत वाहत जात असल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वाचवत वेळीच जिल्हा रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल
- पाण्याचा अंदाज न आल्याने ही व्यक्ती पाण्यात पडल्याची माहिती
- काल गोदावरी नदी परिसरात आयोजित करण्यात आली होती गोदा महाआरती
- याच कार्यक्रमासाठी आले असताना घडली घटना


इतर महत्वाच्या बातम्या 


Congress on Sanjay Gaikwad : ज्यांची 11 रुपयांची लायकी नाही, त्यांच्याकडून 11 लाखांचं बक्षीस देण्याची भाषा, काँग्रेसचा संजय गायकवाडांवर हल्लाबोल