Nashik Farmers Mini Tractor News : शेती करताना सध्या शेतकऱ्यांना (Farmers) विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतीसाठी होणारा खर्च देखील वाढत जात आहे. अशातच एका तरुण शेतकऱ्याने वडिलांच्या मदतीने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे शेतीसाठी उपयुक्त असणारे मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) म्हणजे पॉवर टेलर मशिन तयार केले आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
जुन्या वस्तू जमा करत अवघ्या 2 हजार रुपयात बनवला मिनी ट्रॅक्टर
शेती करताना शेतकऱ्यांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. शेतीसाठीचा खर्च वाढला आहे, मात्र उत्पादन घटले आहे. जे उत्पादन मिळते, त्याला भाव मिळेल याची देखील शाश्वती नसते. त्यामुळं कमी खर्चात लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंत शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खर्च कमी करण्यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील प्रविण कोल्हे या तरुण शेतकऱ्याने टाकावू वस्तूपासून मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. घरी जुन्या पडलेल्या वस्तू जमा करत त्याने अवघ्या 2 हजार रुपयात हा मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. यातून शेतीची कोळपणी, नांगरणी, सरी पाडणे असे विविध काम केली जातात. हे सर्व करताना वडिल शशिकांत कोल्हे यांचे त्यांनी मार्गदर्शन घेतले. या मिनी ट्रॅक्टरचा वापर ते स्वत:च्या शेतीसाठी करत आहेत.
पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केलं स्वागत
एकूणच शेतीसाठी काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करत एका तरुण शेतकऱ्याने केलेल्या मिनी ट्रॅकरचे गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. या मिनी ट्रॅक्टरमुळं खर्चाला ब्रेक लागून पैशाची बचत होते आहे. शेतीसाठी मदत होत असलेल्या या मिनी ट्रॅक्टरला येवला तालुक्यात सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
दरम्यान, सध्या शेतकरी संकटात आहे. कारण एका बाजुला शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो दर मिळत नाही तर दुसऱ्या बाजुला शेती उत्पादन खर्च वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: