Guardian Minister Post : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका सहन करावा लागला. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत महायुतीत तिढा दिसून आला. अखेर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून आता सर्वांचे लक्ष पालकमंत्रिपदाकडे लागले आहे. आता पालकमंत्रिपदाची संभाव्य यादी समोर आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? याबाबत संभाव्य यादी समोर आली आहे. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातील आठ आमदारांची वर्णी लागली. सिन्नरचे अॅड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व दिंडोरीचे नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) या दोघांनी प्रथमच मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजप संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. महाजन हे फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्या पाठोपाठ धुळे येथून जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने फडणवीस यांनी त्यांच्या दुसऱ्या शिलेदाराला मंत्रिमंडळात बरोबर घेतले. तर भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. तर शिवसेनेच्या विभाजनानंतर उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला उभारी देण्याचे काम दादा भुसे (Dada Bhuse) व गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या निकटवर्तीयांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.  


उत्तर महाराष्ट्रातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी



  • जळगाव - गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे

  • अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील

  • अकोला - माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे

  • चंद्रपूर - नरहरी झिरवळ

  • धुळे - जयकुमार रावल

  • लातूर - गिरीष महाजन

  • नाशिक - दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा


पालकमंत्रिपदाची संभाव्य यादी


नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
 ठाणे - एकनाथ शिंदे
 पुणे - अजित पवार
बीड - अजित पवार
सांगली - शंभूराज देसाई
सातारा - शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाट / अतुल सावे
जळगाव - गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ - संजय राठोड
कोल्हापूर - हसन मुश्रीफ
अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील
अकोला - माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे. 
अमरावती - चंद्रकांत पाटील
भंडारा - राष्ट्रवादी 
बुलढाणा - आकाश फुंडकर
चंद्रपूर - नरहरी झिरवळ
धाराशीव - धनंजय मुंडे
धुळे - जयकुमार रावल
गडचिरोली - भाजप
गोंदिया - आदिती तटकरे
हिंगोली - आशिष जैस्वाल
लातूर - गिरीष महाजन
मुंबई शहर - प्रताप सरनाईक
मुंबई उपनगर - मंगलप्रभात लोढा
नांदेड - आशिष शेलार
नंदुरबार - अशोक ऊईके
नाशिक - दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
पालघर - गणेश नाईक
परभणी - मेघना बोर्डीकर
रायगड - भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी - उदय सामंत
सोलापूर - जयकुमार गोरे
वर्धा - पंकज भोयर
वाशिम - दत्तात्रय भरणे
जालना - अतुल सावे
लातूर - बाळासाहेब पाटील


आणखी वाचा 


Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणातील दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; पुण्यातून सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात