Nashik News : नाशिकच्या (Nashik) गोदा घाटावर अस्थीविसर्जन, दशक्रिया विधी पार पाडले जातात, रोजच शेकडो भाविकांची इथे गर्दी जमते, अनेक कुटुंबियांचे पुरोहितही ठरलेले असतात, मात्र तरीही वादाचे प्रसंग अनेकवेळा उद्भवतात, आजही असाच वाद झाला आणि या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला. काय घडले नेमके?
यजमान पळवला, अन् पुरोहितांमधील वाद टोकाला!
त्र्यंबकेश्वरमध्ये पूजेच्या कारणावरून पुरोहितांमध्ये हाणामारीच्या अनेक घटना घडल्यात, मात्र आता नाशिकचा गोदाघाट ही त्याला अपवाद राहिला नसल्याचं स्पष्ट होत आहे. पूजेसाठी आलेला यजमान पळविण्याच्या कारणावरून नाशिकच्या गोदा घाटावर पुरोहितांच्या दोन गटात चांगलीच हमरीतुमरी झाली. काही पुरोहितांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला, गोदा घाटावर अस्थीविसर्जन, दशक्रिया विधी पार पाडले जातात, रोजच शेकडो भाविकांची इथे गर्दी, अनेक कुटुंबियांचे पुरोहित ही ठरलेले असतात, मात्र तरीही वादाचे प्रसंग अनेकवेळा उद्भवतात, आजही असाच वाद झाला आणि या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक
यजमान पळवण्याच्या वादातून आज पंचवटीत गंगाघाटावर पुरोहितांमध्ये तुंबळ भांडण झाले. यामुळे दशक्रिया व इतर विधींसाठी राज्यभरातून आलेल्या नागरिकांची चांगलीच करमणूक झाली. नाशिक येथे दक्षिण गंगा गोदावरी दक्षिण वाहिनी होते. त्यामुळे पितरांच्या पिंडदानासाठी नाशिकच्या रामघाटाचे मोठे महत्व आहे. यामुळे येथे राज्यभरातून भाविक पूर्वजांच्या पिंडदान विधीसाठी येत असतात. तसेच अस्थिविसर्जनासाठीही हिंदूंच्या दृष्टीने रामघाटाचे मोठे महत्व आहे. येथे रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी विधी करण्यासाठी पुरोहितांची वतने ठरलेली आहेत. मात्र, बऱ्याचदा नियम मोडून एकमेकांचे यजमान पळवण्याचे प्रकार घडत असतात. तसाच प्रकार आज सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- शिवसेना कोणता 'बॉम्ब' फोडणार? आज पत्रकार परिषद; भाजप नेत्यांना कोठडीचा रस्ता दाखवण्याचा राऊतांचा इशारा
- Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुका शिवसेना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात लढणार, संजय राऊतांचं वक्तव्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha