Nashik News : पावसाळ्याच्या दिवसात कधी रौद्ररूप, तर कधी धोधो कोसळणारा, खळखळून वाहणारा नाशिकचा (Nashik) प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा (Someshwar WaterFall) प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. नाशिकच्या गोदामाईचे सौंदय खुलविणारा, नाशिककरांच्या पिढ्यान-पिढ्यांसाठी सहलीचं हक्काचं ठिकाण असणारा हा धबधबा आता फेसळला आहे.  गोदावरी नदीचे पात्रही फेसाळलेल्या पाण्याने पांढरे झाले आहे. सोमेश्वर धबधबा परिसरातील गंगापूर गाव,आनंदवल्ली शिवारात दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रंचड दुर्गंधी देखील पसरल्याचं समोर आलं आहे. या सर्वासाठी कारणीभूत ठरत आहे, सोमेश्वर धबधबाच्या वरच्या बाजूस असणारा  एसटीपी प्लँट (STP plant). या मलनिस्सारण केंद्रातून गोदावरी नदीमध्ये कोणतीही प्रकिया करून पाणी सोडले जात नसल्याचा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा आरोप आहे.


केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सन 2019 मध्ये या मलनिस्सारण केंद्राची उभारणी करण्यात आली. भूसंपादन आणि प्रकल्प उभारणीसाठी जवळपास 50 कोटीपर्यंत खर्च करण्यात आला, खाजगी कंपनीच्या माध्यमातून सध्या कामकाज सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याची कबुली व्यवस्थपणाकडून देण्यात आली आहे. 


शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा


आगामी महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे भाजपवर (BJP) टीका करण्याची आयती संधी शिवसेनेच्या हाती आली आहे. त्यामुळे 8 दिवसांचा अल्टीमेटम शिवसेनेनं (Shivsena) दिला आहे. अन्यथा सोमेश्वर धबधब्यावरच आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha