Nashik BJP Meet : नाशिकमध्ये भाजपची कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच कारमधून या बैठकीसाठी आलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये अंतर्गत वाद आहे, अशी नेहमीच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा असते. परंतु आज देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) एकाच कारमधून या कार्यकारीणीच्या बैठकीला उपस्थित झाले. त्यामुळे या घटनेची सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा आहे. 


नाशिकमध्ये (Nashik) दोन दिवसीय भाजप कार्यकारिणीची (BJP Meet) बैठक सुरू असून आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी राज्यभरातून भाजपचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित आहेत. यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्यासह पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत. दरम्यान आज दुपारी कार्यक्रम स्थळी येत असताना देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकाच गाडीतून बैठक स्थळी पोहोचले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावलेल्या कार्यक्रमांपासून पंकजा मुंडे जाणीवपूर्वक पाठ फिरवत असल्याचे देखील बोलले जात होते. तर देवेंद्र फडणवीस आगामी काळात बीडमध्ये पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी जिल्ह्यात नव नेतृत्व उभं करण्याचे तयारी असल्याची कुजबूज सुरू झाली होती. या सर्व घडामोडीमुळे या चर्चाना उधाण आले होते. तर नाशिकमध्ये सुरू असलेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला दोघेही एकच गाडीतून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.


नाशिकमध्ये भाजपची कार्यकारिणी बैठक, फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात अंतर्गत वाद असुनही फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच कारमधून बैठकीसाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपा मध्ये पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये छुपे मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आजच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस हे एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी आल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील भाजप पक्षामध्ये काही दिवसांपूर्वी बेबनाव असल्याचं दिसून आलं होतं. यात भाजपने त्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या. पंकजा मुंडे यांना डावलण्यात येत असल्याचेही बोलले जात होतं. 


फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच गाडीतून... 


काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या भाजपच्या अनेक कार्यक्रमांपासून अलिप्त राहत असल्याचे चर्चा होत्या. तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पक्षातीलच काही लोक पंकजा मुंडेंना आणि पक्षाला बदनाम करत असल्याचा आरोपच बावनकुळे यांनी केला होता. आज मात्र देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच गाडीतून भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित झाल्या. मात्र आजच्या प्रसंगानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा भाजपमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात पंकजा मुंडे यांना भाजप पक्ष मोठी जबाबदारी देणार असेही बोलले जात आहे.