नाशिक: नाशिकच्या सातपूर परिसरातील गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या आरपीआय आठवले गटाच्या जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (RPI Leader Prakash Londhe) याच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकाचा हातोडा पडणार असून बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे. नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारी (Nashik Crime News) विरोधात नाशिक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे, त्यात आता महापालिकेनेही उडी घेतली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार आहे.(RPI Leader Prakash Londhe)
Nashik Crime News: आजच्या कारवाईतून गुन्हेगारांना इशारा
25 बाय 15 मीटरचा तळ मजला, पहिला मजला आणि त्यावर होर्डिंग लावण्यासाठी केलेली इमारत साधारणपणे तीन चार वर्षांपूर्वी नंदिनी नदीच्या पुरररेषेत बांधण्यात आली. या इमारतीत भाडेकरू टाकून त्यांच्याकडून भाडे वसूल केले जात होते, गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या प्रकाश लोंढे आणि त्याचा पुत्र दीपक लोंढे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाईला सुरवात झाली आहे, चार दिवसांपूर्वी लोंढेच्या आणखी एका इमारतीत भुयार आढळून आल्याने सर्वानाच धक्का बसला होता, त्यामुळे याही इमारतीचा गुन्हेगारी कारणासाठी वापर केला जात असल्याचा पोलीसांना संशय असून आजच्या कारवाईतून गुन्हेगारांना इशारा दिला जात आहे.
Nashik Crime News: बारमध्ये खंडणी उकळण्यासाठी गोळीबाराची घटना
लोंढेच्या इमारतीचे पाडकाम झाल्यानंतर आजूबाजूच्या झोपडपट्टीमधील अनधिकृत घरांना ही नोटीस पाठवून तेही पाडले जाणार आहे, आयटीआय सिग्नल परिसरातील एका बारमध्ये खंडणी उकळण्यासाठी गोळीबाराची घटना घडली होती, त्यात एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, प्रकाश लोंढे याचा मुलगा भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भूषण लोंढे अजूनही फरार आहे, त्यामुळे दहशत माजविण्याचे त्याचे अड्डे आता जमीन दोस्त करणयाची कारवाई सुरू झाली असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Nashik Crime News: होर्डिंगच्या माध्यमातून लाखोंची कमाई
लोंढे याने उभारलेल्या इमारतीत भुयार सापडले होते. तर इमारतीच्या करती होर्डिंगसाठी लोखंडाचा मोठा सांगाडा उभारण्यात आला होता. या माध्यमातून होर्डिंग लावून परिसरात दहशत माजवण्याचा प्रकार देखील होत होता. याशिवाय याठिकणाहून लोंढे याला लाखो रुपयांचा आर्थिक फायदा होत होता.