Nashik Malegaon News: करियर मार्गदर्शनाच्या नावाखाली 'सत्य मलिक' संस्थेकडून विद्यार्थ्यांना धर्मपरिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मालेगावमधील (Malegaon News) हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून मसगा कॉलेजमधील घटनेची दखल घेण्यात आली आहे. तसेच, या संस्थेवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 


नाशिकच्या (Nashik News) मालेगावमध्ये 'करिअर गाईडन्स' नावाखाली विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण आणि धर्म परिवर्तनाचे धडे दिले जात असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी मसगा येथील कार्यक्रमस्थळी गदारोळ घातला. या घटनेनंतर या संस्थेवर गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई झाल्याचा तसेच पोलीस प्रशासन दबावात काम करत असल्याचा आरोप नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. तसेच त्यांनी थेट मालेगाव कॅम्प पोलीस स्थानक गाठलं आणि पोलीस प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. यानंतर याप्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मालेगावच्या मसगा महाविद्यालयात पुण्याच्या 'सत्य मलिक लोक सेवा ग्रुप' तर्फे भारतीय छात्र सेना (NCC) यांच्यातर्फे अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'करिअर गाईडन्स' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख्य व्याख्यात्यांनी प्रथम 'कुराण' मधील कलमा पढवत इतर धर्मीय मुलांनाही मुस्लिमांप्रमाणे शिक्षण करण्याचं आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यक्रमस्थळी दाखल होत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नाशिकच्या मालेगावमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. हा प्रकार सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. सध्या नाशकातील परिस्थिती नियंत्रणात आहे. 


घटनेचे गांभीर्य लक्षात घेत याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांसह व्याख्यात्यांनाही ताब्यात घेतलं. मात्र पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाविद्यालय प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या पालकमंत्री दादा भुसे यांनी थेट मालेगाव कॅम्प पोलीस स्थानक गाठत तब्बल 2 तास ठाण मांडले. वस्तुस्थिती पोलिसांच्या लक्षात आणून देत पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलं. जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. या दरम्यान पोलीस स्थानाकासमोर मोठा जमाव जमला होता. 


घडलेल्या प्रकाराची दखल घेत महाविद्यालय प्रशासनानं कार्यक्रमांचं आयोजन करताना व्यवस्थापनाची परवानगी न घेतल्यानं महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तडकाफडकी निलंबित केलं. दरम्यान मंत्री दादा भुसे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवत कार्यक्रमांचे आयोजक आणि व्याख्याते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik Cyber Police : खबरदार! वादग्रस्त पोस्ट कराल तर? आक्षेपार्ह पोस्ट तपासणीसाठी नाशिक पोलिसांच नवं 'सॉफ्टवेअर'