Chhagan Bhujbal नाशिक : देशभरातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. 04 जून रोजी निकालाचे चित्र स्पष्ट होईल. त्यातच अनेक राजकीय नेते विजयाचे दावे करताना दिसत आहेत. तसेच विविध वृत्तसंस्थांचे एक्झिट पोल (Exit Poll) देखील समोर आले आहेत. आता राज्यातील एक्झिट पोलबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील मोठा दावा केला आहे.


अलीकडे वेगवेगळ्या कारणांनी छगन भुजबळ चर्चेत आले आहेत. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे फोटो फाडल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली होती. यावर अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला. मुश्रीफ यांच्या नाराजीनंतर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, 'ते वरिष्ठ आहेत. त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. तुम्ही जितेंद्र आव्हाडांना विरोध करा परंतु बाबासाहेबांना, बहुजनांना नको असलेली मनुस्मृतीचा (Manusmriti) आधी विरोध करा. ती शालेय शिक्षणात येता कामा नये. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेम आहे. अर्थात ते असलंच पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांना काय शिक्षा द्यायची ती द्या. पण, दुसरीकडे मनुस्मृतीला देखील विरोध करा, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे .


लोकसभेच्या एक्झिट पोलबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा


तसेच भुजबळांनी एक्झिट पोलवर महत्त्वाचं भाष्य केले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगलेला पाहायला मिळाला. यावर 'महायुतीच्या ४५ जागा निवडून येतील, तर चुकून दोन-चार जागा महाविकास आघाडीला जातील', असा दावा भुजबळ यांनी केला आहे. एकंदरीतच निवडणुकीतील भुजबळांची नाराजी, जितेंद्र आव्हाडांची पाठराखण आणि निवडणूक (Election 2024) एक्झिट पोलवर केलेला दावा, यामुळे छगन भुजबळ चांगलेच चर्चेत आहेत. आता भुजबळांनी केलेला दावा कितपत खरा ठरणार का? हे येत्या 04 जून रोजी स्पष्ट होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Chhagan Bhujbal: काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच, 80-90 जागांवरुन भुजबळांनी भाजपला सुनावलं!


Nilesh Rane: छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही बोललेलं सहन करणार नाही, भाजप नेत्यांचा इशारा