Chhagan Bhujbal Nashik Speech : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर नाराज झालेल्या छगन भुजबळांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर तोफ डागली आहे. नाशिकमध्ये झालेल्या समता परिषदेच्या सभेमधून भुजबळांनी आता रस्त्यावरची लढाई सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. प्रश्न हा माझ्या मंत्रिपदाचा नाही तर उद्या समाजाचे प्रश्न उपस्थित होतील त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच जर मंत्रिपद द्यायचं नव्हतं तर मग निवडणुकीला उभं कशाला केलंत असा सवालही त्यांनी अजित पवारांना केला. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आपल्यासाठी प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीसही आपल्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होते असं सांगत मंत्रिपद नाकारण्यामागे एकटे अजित पवारच असल्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले. 

छगन भुजबळांचे भाषण जशास तसे


आज येवला-लासलगाव मतदारसंघात कोणी तरी गेल्यासारखी अवकळा पसरली आहे असं काही जण म्हणाले. येवला लासलगावच नाही, तमाम महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची हीच भावना आहे. माझ्या मतदारसंघातील मराठा समाजाचे लोकही विचारतायत असं कसं झालं? आपणच धक्क्यात आहोत असं नाही. अख्या देशातून फोन सुरु आहेत. सगळ्यांची मागणी आहे. एखादी घटना घडते आणि माणसं पेटून उठतात तसा प्रकार सुरु आहे. तरीही कोणी पेटवापेटवी करायची नाही. जोडे मारो, असला प्रकार नको, संयम ठेवा. 

 

दलित, मुस्लिम, मागासवर्गीयांसोबतच मराठा समाजही आपल्यासोबत आहेत. महिलांच्या शिक्षणाला, मुलींच्या शिक्षणाला विरोध करणारे तुमच्या आमच्यातीलही होते.

 

आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाहीत. आजही दलित, आदिवासी सापडतात. मात्र असा भ्रम करुन देण्यात आला की आरक्षण मिळाल्यावर सोन्याची कौलं लागतील. मराठा समाजाच्या आरक्षणाला मी कधीही विरोध केला नाही. प्रश्न सोडवले पाहिजे मात्र एकमेकांवर कुरघोडी नको. 350 पेक्षा जास्त जातीत तुम्ही आलात तर तुमचाही फायदा होणार नाही. मोदींनी दिलेल्या ईडब्यूएसच्या आरक्षणात एकटा मराठा समाज 8 टक्के होता. मी समोर बसून मार्ग काढण्यासाठी तयार आहे. 

 

मला पाडण्याचा प्रयत्न झाला. माझी 60-70 हजार मतं कमी झाली. पण संपूर्ण दलित, मुस्लिम, गुजराती समाज माझ्या मागे उभा राहिला. प्रश्न नुसता मंत्रिपदाचा नाही. प्रश्न अस्मितेचा आहे. एखाद्या समाजासाठी लढणारी माणसं आपल्याला हवी. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

 

आता लढाई आमदार म्हणून लढणार. तिथे कितीही बंधन असली तरी रास्ता तो मेरा है. 

 

मी संपूर्ण राज्यात जाणार. एवढंच नाही तर अनेक राज्याराज्यात जाणार. पुन्हा ओबीसीचा एल्गार करणार. दिल्लीत रामलिला मैदान भरवलेलं सगळ्यांनी बघितलं. पटना, बिहारमध्ये पाऊस पडला तरी लोक बसले होते. इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण आणि त्यानंतर समता परिषदेची सभा इतकी मोठी झाली. पूर्ण मैदान भरलं होतं. काहीचं आपल्याबद्दल वेगळं मत निर्माण झालं आहे. 

 

मेरे बारे मे कोई राय मत बनाना गालिब.. एक ऐसा दौर आयेगा मेरा वक्त भी बदलेगा. और तेरी राय भी बदलेगी.

 

मोदी, अमित शहा साहेबांनी प्रत्येक मतदारसंघ कोणाला द्यायचा त्यावर चर्चा झाल्यावर भुजबळ नाशिकमध्ये उभे राहतील असं सांगितलं. शिंदेचा त्या ठिकाणी सिटिंग कॅन्डिडेट होता. वरिष्ठांनी सांगितलं नाही भुजबळच असतील. मी तिकीट मागितलं नाही. तुम्हाला उभं रहावं लागेल असं सांगण्यात आलं. असं अजिबात चालणार नाही. तुम्हाला उभं रावं लागेल. नसेल उभं रहायचं नसेल तर दिल्लीला जाऊन सांगा असं सांगितलं.  

 

सर्व समाजातील लोक पाठीशी होते. दोन-तीन आठवडे झाले कोणी नावच घेईना. शेवटी मीच जाहीर केलं मी उभा राहणार नाही. नंतर म्हणाले मी घाई केली. त्याचमुळे आणखी 5-7 ठिकाणी उलटे निकाल लागले. 

 

राज्यसभा आली आणि सुनेत्रा ताई पडल्या म्हणून विचार करावा लागेल. सातारची जागा आली. मकरंद पाटील यांचे भाऊ प्रयत्नशील होते. त्यामुळे नितीन पाटील यांना खासदार केलं. आमच्याशी चर्चा पण केली नाही. घरकी मुरगी दाल बराबर. तुमची गरज राज्यात जास्त म्हणाले. तुमचा चेहरा निवडणुक हवा म्हणाले. 

 

त्यांच्या भावाला राजीनामा द्यायला सांगतो. तुम्ही राज्यसभेवर जा असं सांगितलं आणि मकरंद पाटील यांना मंत्री केलं. मी म्हणलो तसं असतं तर मी निवडणूक लढलो नसतो. माझ्या लोकांनी काय करायचं? कपाळ अपटून घेतील बिचारे. मी सांगितलं मी माझ्या लोकांना सोडू शकत नाही. 

 

प्रफुल भाईंनी मध्यस्ती केली. अजितदादांना सांगितलं बसून चर्चा करु म्हणाले. मात्र दुर्दैवाने बसले नाही. प्रफुल पटेल, तटकरेंनी असं करु नका म्हणून प्रयत्न केला. एवढंच नाही तर फडणवीसही शेवच्या क्षणापर्यंत विरोध करत होते असं करु नका.  प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही. समाजाचे प्रश्न उपस्थित होतील तेव्हा संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? मंत्रिपद किती वेळा आले किती वेळा गेले. विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं. 

 

मंत्रिपद नसले तरी रस्तावर आहे. अहवेलनेचे शैल्य मनात आहे. सगळ्यांशी चर्चा करुन पुढचं पाऊल उचलावं लागेल. तुमच्याशी चर्चा करुन विचारपूर्वक निर्णय घेईन . मै मौसम नहीं जो पल मे बदल जाऊ.. मै उस पुराने जमानेका सिक्का हूं. ऐसे फेक न देना तुम्हारे बरे वक्त मे.