नाशिक : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेले आरक्षण महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टिकवता आले नाही. सरसकट आरक्षण देणे घटनाबाह्य आहे. आर्थिक मागास आरक्षण गेल्याने मराठा समाजानं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 


चंद्रकांत पाटील म्हणाले की, 1967 साली ओबीसी आरक्षणाची (OBC Reservation) सुरुवात झाली. ज्यांना मागास ठरवलं गेलं त्यांना घटनात्मक आरक्षण दिले गेले. शाहू महाराजांच्या काळात आरक्षण दिले गेले. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले ते महाविकास आघाडीला टिकवता आले नाही. सरसकट आरक्षण देणे हे घटनाबाह्य आहे. आर्थिक मागास प्रवर्गाला 10 टक्के एससीबीसी (SCBC) आरक्षण दिले. ज्यांना जातीय आरक्षण आहे त्यांना  एससीबीसी (SCBC) आरक्षण दिले जात नाही. आर्थिक मागास आरक्षण गेल्याने मराठा समाजानं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली, असे त्यांनी म्हटले. 


मनोज जरांगे मनापासून मराठा आरक्षणासाठी काम करताय


ते पुढे म्हणाले की, मराठा, ब्राह्मण, लिंगायत समाज 10 टक्के आरक्षणातून बाहेर पडले. शाहू महाराजांच्या काळापासून सुरू असलेल्या आरक्षणाचा विचार केला पाहिजे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मनापासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) काम करत आहेत. देशात पितृसत्ताक पद्धतीने आरक्षण मिळते. मातृसत्ताक पद्धतीने आरक्षणाची मागणी कोर्टाने अनेकदा फेटाळली आहे, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. 


उध्दव ठाकरे पळकुटेपणा करताय


13 टक्के आरक्षणात एससी आणि 7 टक्के एसटी जातीच्या आधारावर अ, ब, क, ड वर्गवारी करावी, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्याप्रमाणे पुढे ओबीसीमध्ये अ, ब, क, ड विभाग होतील. प्रकाश आंबेडकरांनी सर्व पक्षीय बैठकीत चांगली भूमिका घेतली होती. सर्वांकडून लिखित घ्या असे त्यांनी म्हटले होते. आता शरद पवार (Sharad Pawar), उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी. विरोधी पक्षात फक्त बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) बोलतात. इतर कुणी बोलायला तयार नाही.  उध्दव ठाकरे हे पळकुटेपणा करत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना लगावला.  तसेच टक्का वाढवून काय होणार? मराठा आरक्षण द्यायचे की नाही ते ठरवले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


आणखी वाचा 


Chandrakant Patil on Majha Maha Katta : त्यावेळी एकनाथ शिंदे माझ्या मदतीला धावले, चंद्रकांत पाटलांनी सांगितला पडद्यामागचा किस्सा!